Full Width(True/False)

WhatsApp Desktop App: आता स्मार्टफोनशिवाय डेस्कटॉपवर वापरता येणार WhatsApp, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली : Meta-मालकीच्या इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म द्वारे MacOS आणि Windows युजर्ससाठी एक नवीन अॅप आणले जाणार आहे आहे. व्हॉट्सअॅप फीचर ट्रॅकिंग वेबसाइट WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, व्हॉट्सअॅप एका नवीन अॅपच्या विकासावर काम करत असून रिपोर्टनुसार, हे युनिव्हर्सल विंडो प्लॅटफॉर्मवर आधारित अॅप असेल. वाचा: व्हॉट्सअॅपचे बीटा व्हर्जन नुकतेच लाँच करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत, सर्व युजर्स हे अॅप वापरू शकणार नाहीत. तसेच, ते वापरताना काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. कंपनी लवकरच त्याचे Stable version स्थिर आवृत्ती लाँच करू शकते. काय फायदा होईल ? WhatsApp डेस्कटॉप अॅप बंद केल्यानंतरही नोटिफिकेशन फीचर काम करत राहील. म्हणजे आता डेस्कटॉपवर Whatsapp चालवण्यासाठी फोनची गरज भासणार नाही. युजर्स डेस्कटॉपवरच व्हॉट्सअॅपवर लॉग-आउट आणि लॉग-इन करू शकतील. हे पूर्णपणे नवीन अॅप असेल, ज्यामुळे युजर्सना WhatsApp वेब उघडण्यासाठी Google Chrome, Microsoft Edge सारख्या ब्राउझरची गरज भासणार नाही. नवीन अॅप वापरण्यासाठी Windows सिस्टममध्ये x64 आर्किटेक्चर-आधारित CPU आणि Windows 10 Version 14316.0 किंवा त्यापेक्षा हाय असणे आवश्यक आहे. WhatsApp डेस्कटॉप अॅप कसे डाउनलोड करावे ? सर्वप्रथम मायक्रोसॉफ्ट विंडोजच्या स्टार्ट ऑप्शनवर क्लिक करा. नंतर तेथे स्टोअर पर्याय शोधा. यानंतर मायक्रोसॉफ्ट विंडोज स्टोअर अॅप येईल. येथे . तुम्हाला WhatsApp Desktop शोधायचे आहे. त्यानंतर डाउनलोड करण्यासाठी गेट बटणावर क्लिक करावे लागेल. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3HurOXh