Full Width(True/False)

Amazon India चा Fab Phone Fest आजपासून सुरू, मोबाइलवर ४० टक्के डिस्काउंट

नवी दिल्लीः ई-कॉमर्स वेबसाइट Amazon India वर Fab Phone Fest सेल आजपासून म्हणजेच २४ नोव्हेंबर पासून सुरू झाला आहे. हा सेल २८ नोव्हेंबर पर्यंत सुरू राहणार आहे. या सेलमध्ये जवळपास सर्वच स्मार्टफोन कंपन्यांच्या डिव्हाइसवर डिस्काउंट दिला जात आहे. यासोबतच ग्राहकांना स्मार्टफोन खरेदी केल्यावर एक्सचेंज ऑफर आणि नो कॉस्ट ईएमआय मिळणार आहे. ४० टक्के डिस्काउंट मिळणार अमेझॉन इंडियावर उपलब्ध माहितीनुसार, Fab Phone Fest सेल मध्ये ग्राहकांना जास्तीत जास्त फोनवर ४० टक्के सूट दिली जाणार आहे. सोबत ग्राहकांना एसबीआय बँकेकडून १० टक्के डिस्काउंट, नो कॉस्ट ईएमआय आणि एक्सचेंज ऑफर मिळणार आहे. Techno Spark 7t या फोनची किंमत ८ हजार ५९९ रुपये आहे. या डिव्हाइसवर १० टक्के डिस्काउंट, नो कॉस्ट ईएमआय आणि ८ हजार १५० रुपयाचा एक्सचेंज ऑफर मिळणार आहे. टेक्नो स्पार्क ७ टी स्मार्टफोनमध्ये ६.५२ इंचाचा डिस्प्ले आणि 6000mAh ची जंबो बॅटरी मिळणार आहे. याशिवाय, या स्मार्टफोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आणि ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. Samsung M12 या फोनची किंमत ११ हजार ४९९ रुपये आहे. या स्मार्टफोनवर १० हजार ३४९ रुपयाचा बेस्ट ऑफर मिळेल. या फोनवर नो कॉस्ट ईएमआय आणि १० हजार ८५० रुपयाचा एक्सचेंज ऑफर दिला जात आहे. सोबत एसबीआय कडून १० टक्के डिस्काउंट दिला जात आहे. या फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा क्वॉड रियर कॅमेरा सेटअप आणि ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. याशिवाय, स्मार्टफोनमध्ये 6000mAH ची बॅटरी आणि Exynos850 प्रोसेसर दिला जाणार आहे. Mi 11x 5G या फोनची किंमत २७ हजार ९९९ रुपये आहे. या स्मार्टफोनला अमेझॉनवर २१ हजार ७४९ रुपये किंमतीत उपलब्ध करण्यात आले आहे. या स्मार्टफोनला एक्सचेंज ऑफर आणि नो कॉस्ट ईएमआय वर खरेदी केले जावू शकते. या फोनवर ICICI बँकेकडून २ हजार रुपयांपर्यंत इंस्टेंट डिस्काउंट मिळतो. या स्मार्टफोनमध्ये Snapdragon 870 प्रोसेसर, ६.६७ इंचाचा अमोलेड डिस्प्ले आणि 4520 mAH ची बॅटरी दिली आहे. ३३ वॉट फास्ट चार्जरचा सपोर्ट दिला आहे. फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आणि २० मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. वाचा: वाचा वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3xiIGLY