Full Width(True/False)

Amazon Prime: १४ डिसेंबरपासून या युजर्सना Amazon Prime साठी मोजावे लागणार अधिक पैसे, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली: ऑनलाइन व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म च्या सदस्यत्व प्लानमध्ये वाढ होऊ शकते. नवीन Amazon Price सदस्यता किमती १४ डिसेंबरपासून लागू होणार आहेत. रिपोर्टनुसार, Amazon प्राइम सबस्क्रिप्शन ५० टक्क्यांपर्यंत महाग होऊ शकते. अशा परिस्थितीत, Amazon Prime चा वार्षिक प्लान १४ डिसेंबरनंतर १,४९९ रुपयांमध्ये येईल, जो सध्या ९९९ रुपयांमध्ये येतो. म्हणजे वार्षिक प्लानमध्ये ५०० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्याच तीन महिन्यांच्या प्लानसाठी ३२९ रुपयांऐवजी ४५९ रुपये खर्च करावे लागतील. तर मासिक प्लान १२९ रुपयांऐवजी १७९ रुपयांचा असेल. पाहा डिटेल्स. वाचा: हे युजर्स प्रभावित होणार नाहीत: Amazon Prime सदस्यत्वाच्या वाढलेल्या किमतींचा परिणाम Amazon Prime सदस्यत्व प्लानसाठी Auto Renewal पर्याय निवडलेल्या ग्राहकांवर होणार नाही, त्यामुळे अशा युजर्सवर सध्या महागाईचा भार पडणार नाही. सोप्या भाषेत सांगायचे तर, जर Amazon Prime च्या पर्यायासह ग्राहकाचा प्लान १४ डिसेंबरनंतरही संपत असेल, तर अशा लोकांना जुन्या दरातील Amazon प्राइम मेंबरशिप सुरू ठेवता येईल. मात्र ही सुविधा फक्त एकदाच असेल. Airtel आणि Vi Plan च्या किंमती वाढल्या आहेत: टेलिकॉम कंपनी Airtel आणि Vodafone-Idea (VI) कडून रिचार्ज प्लानच्या किंमती सुमारे २० ते २५ टक्क्यांनी वाढवण्यात आल्या आहेत. २६ नोव्हेंबरपासून देशभरात एअरटेलच्या नवीन किमती लागू होत आहेत. तर २५ नोव्हेंबरच्या एक दिवस आधी देशात Vi च्या नवीन किमती लागू होतील. तसेच, लवकरच रिलायन्स जिओकडून रिचार्ज प्लानमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. पण ही वाढ Airtel आणि Vi पेक्षा कमी असेल. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3oT8lHj