नवी दिल्ली : सध्या भारतात ५जी ट्रायल सुरु आहे. पुढील वर्षी मार्चपर्यंत देशात ५जी नेटवर्क उपलब्ध होण्याची शक्यता आहे. मात्र, ५जी प्रमाणे ६जी साठी जास्त वाट पाहावी लागणार नाही. केंद्र सरकारनुसार, ५जी टेक्नोलॉजीनंतर त्वरित ६जी ला भारतात लाँच केले जाईल. वाचा: यांच्या माहितीनुसार, भारत स्वदेशी ६जी टेक्नोलॉजी विकसित करण्याच्या दिशेने काम करत आहे. भारतात वर्ष २०२३ अखेरीस अथवा २०२४ च्या पहिल्या सहामाहीत ६जी टेक्नोलॉजी लाँच होऊ शकते, अशी शक्यता त्यांनी वर्तवली आहे. ६जी टेक्नोलॉजीसाठी सरकारने आधीच वैज्ञानिक आणि इंजिनिअर्सला परवानगी दिली आहे. रिपोर्टनुसार, भारतात ६जी टेक्नोलॉजी विकसित करण्याच्या दिशेने काम सुरू झाले आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी सरकारकडून वर्ष २०२३ आणि २०२४ पर्यंतचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, सरकार स्वदेशी ६जी टेक्नोलॉजीवर जोर देत आहे. देशात स्वदेशी टेलिकॉम सॉफ्टवेअर आणि अन्य मॅन्यूफॅक्चरिंगवर लक्ष दिले जात आहे. जेणेकरून, जागतिक बाजारात देखील उपलब्ध करता येईल. दरम्यान, भारतात भारती एअरटेल, रिलायन्स जिओ आणि वोडाफोन आयडियाला ५जी ट्रायलसाठी स्पेक्ट्रमचे वाटप करण्यात आले आहे. या दरम्यान जिओ आणि एअरटेलला जवळपास १ जीबीपीएस पर्यंतचा स्पीड मिळाला. तर वोडाफोन आयडियाला ५जी ट्रायल दरम्यान ९ जीबीपर्यंतचा स्पीड मिळाला. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3r1wCh7