नवी दिल्ली : अॅमेझॉनने काही दिवसांपूर्वीच प्राइम व्हिडिओचे सबस्क्रिप्शन शुल्क वाढवले आहे. आता कंपनीने एक मोठी घोषणा केली आहे. प्राइम व्हिडिओने क्लिप शेअरिंगची सुविधा दिली आहे. म्हणजेच, यूजर्सला चित्रपट अथवा सीरिजच्या क्लिपला व अन्य प्लॅटफॉर्मवर शेअर करता येईल. मात्र, ही क्लिप जास्तीत जास्त ३० सेकंदाची असेल. वाचा: अॅमेझॉनने प्राइम व्हिडिओ अॅपमध्ये क्लिप शेअरिंगची सुविधा दिली असली तरी याचा फायदा केवळ काही ठराविक चित्रपट आणि सीरिजवरच घेता येईल. सोबतच, कंपनीने म्हटले आहे की भविष्यात याचा विस्तार केला जाईल. क्लिप शेअरिंग फीचर सध्या केवळ अमेरिकेतील आयओएस यूजरसाठी उपलब्ध आहे. अमेरिकेतील यूजर्सला आयफोन आणि आयपॅडवर व्हिडिओ शेअरिंगचा पर्याय दिसत आहे. क्लिप शेअर बटनवर क्लिक केल्यानंतर व्हिडिओ पॉज होईल व ३० सेकंदांची क्लिप शेअर करता येईल. त्यानंतर क्लिपला एडिट आणि शेअर करण्याचा देखील पर्याय मिळेल. शेअरच्याआधी प्रीव्ह्यूचा पर्याय देखील मिळतो. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच अॅमेझॉनने प्राइम व्हिडिओ मेंबरशिपची किंमत वाढविण्याची घोषणा केली आहे. आता ९९९ रुपयांच्या पॅकची किंमत १,४९९ रुपये आहे. ही किंमत १२ महिन्यांसाठी आहे. तर ३२९ रुपयांच्या तिमाही प्लानची किंमत ४५९ रुपये होईल. १२९ रुपयांच्या मासिक प्लानची किंमत १७९ रुपये होईल. नवीन किंमती लवकरच लागू होणार आहेत. मात्र अॅमेझॉनने याच्या तारखेची माहिती दिलेली नाही. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3kA7F8l