Full Width(True/False)

शाओमीचा भारतात दबदबा कायम, पोकोने घातला धुमाकूळ, विकले ४.८ कोटी फोन

नवी दिल्लीः भारताच्या स्मार्टफोन बाजारात शाओमीने पहिल्या स्थानावर आपला दबदबा कायम राखला आहे. कंपनीने जुलै पासून सप्टेंबर या दरम्यान भारतात सर्वात जास्त स्मार्टफोन शीप केले आहेत. परंतु, वर्षाच्या आधारावरील शीपमेंट मध्ये घसरणीची नोंद केली आहे. नुकत्याच जारी करण्यात आलेल्या इंटरनॅशनल डेटा कॉर्पोरेशनच्या एका रिपोर्टनुसार, ३० सप्टेंबर रोजी संपलेल्या २०२१ च्या तिसऱ्या तिमाहीत भारतीय स्मार्ट फोन बाजारात वर्षाच्या आधारावर १२ टक्के घसरणीची नोंद करण्यात आली आहे. या दरम्यान, भारतात ४.८ कोटी स्मार्टफोन शीप करण्यात आले आहे. भारतीय स्मार्टफोन बाजारात गेल्या चार लागोपाठ तिमाहीत वाढ करण्यात आली होती. रिपोर्टमध्ये म्हटले की, शाओमी ने शिपमेंट मध्ये वर्षाच्या आधारावर घसरण होऊनही कंपनीने सर्वात जास्त भागीदारी वर आपला कब्जा मिळवला आहे. 3Q21 शिपमेंट वार्षिक १२ टक्के इंटरनॅशनल डेटा कॉर्पोरेशन (IDC) वर्ल्डवाइड क्वार्टरली मोबाइल फोन ट्रॅकर, 3Q21 मध्ये शीपमेंट मध्ये घसरणी सोबत कंपोनेंटची कमी सोबत असामान्य रुपाने 3Q20 कम्पेरिजन बेस साठी जबाबदार ठरवले आहे. 3Q20 च्या तुलनेत 3Q21 शिपमेंट वार्षिक आधारावर १२ टक्के म्हणजेच ५४.२ मिलियन यूनिटने घसरण होऊन ४८ मिलियन यूनिट झाली आहे. परंतु, तिमाही दर तिमाही तुलनेत भारतीय बाजारात शिपमेंट या वर्षीच्या तिमाहीत ४.७ टक्के वाढून ३.४ कोटी यूनिट वाढून ४.८ कोटी यूनिट झाली आहे. अन्य कंपन्यांची स्थिती जाणून घ्या आयडीसीच्या माहितीनुसार, शाओमीला शीपमेंट मध्ये वार्षिक आधारावर १७ टक्के घसरण पाहावी लागली. परंतु, शाओमीचे सब ब्रँड पोको ने शीपमेंट मध्ये ६५ टक्के जबरदस्त वाढ नोंदवली आहे सॅमसंग तिमाहीत वर्षाच्या आधारावर ३३ टक्के घसरणीसह दुसऱ्या स्थानावर राहिली. वर्षाच्या आधारावर १३ टक्के शीपमेंट घसरणीसह विवो तिसऱ्या स्थानावर राहिली. रियलमीने वार्षिक आधारवर ५ टक्के घसरणीसह चौथ्या स्थानावर कब्जा मिळवला आहे. ओप्पोने १६ टक्के घसरणीसह पाचवे स्थान मिळवले आहे. रिपोर्टच्या माहितीनुसार, 3Q21 साठी प्रमुख बाजारातील निकालाला ऑनलाइन चॅनेल (५२ टक्के) रेकॉर्ड करण्यात आलेल्या शेअरमधील वार्षिक आधारावर ५ टक्के शीपमेंट व्हॅल्यूम घसरणीचा समावेश आहे. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3C61kaE