Full Width(True/False)

Apple Car: विना स्टेअरिंग व्हीलची कार आणण्याच्या तयारीत अ‍ॅपल, जाणून घ्या कधी होणार लाँच?

नवी दिल्ली : टेक दिग्गज अ‍ॅपलला आपल्या वेगवेगळ्या डिव्हाइससाठी ओळखले जाते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून अ‍ॅपलच्या कारबाबत देखील चर्चा सुरु आहे. रिपोर्टनुसार २०२५ मध्ये लाँच करण्याच्या तयारीत आहे. अ‍ॅपल पूर्णपणे सेल्फ ड्रायव्हिंग कारवर काम करत आहे. या व्हिकलमध्ये स्टेअरिंग व्हील व डेल्स देखील नसतील. वाचा: अ‍ॅपल कारचे इंटेरियर अशाप्रकारे डिझाइन केले जाईल की हातांचा वापर न करताही कार चालेल. कंपनी यू शेप्ड सीटिंग फॉर्मेशनवर देखील काम करत आहे. जेणेकरून, अ‍ॅपल कारमध्ये इतर कार्सच्या तुलनेत एक वेगळा अनुभव मिळेल. रिपोर्टनुसार, अ‍ॅपल सेल्फ ड्रायव्हिंग इलेक्ट्रिक कार प्रोजेक्टवर जोमाने काम करत आहे. चार वर्षांच्या आत कारला लाँच करण्याच्या तयारीत आहेत. मात्र, या कालावधीमध्ये कंपनी पूर्णपणे मॅकेनिज्म तयार करू शकेल की नाही, हे सांगणे अवघड आहे. दरम्यान, देखील आधीपासून सेल्फ ड्रायव्हिंग कारचे टेस्टिंग करत आहे. कंपनीने यासाठी WayMo नावाने वेंचर सुरू केले आहे व या अंतर्गत कंपनी प्रोजेक्टवर काम करत आहे. रिपोर्टनुसार, अ‍ॅपल या प्रोजेक्टसाठी इतर कार निर्मात्यांसह करार करत आहे. मात्र, ते लाँचच्या टाइमलाइनमुळे थोडे गोंधळले आहेत. अ‍ॅपल २०१४ पासूनच प्रोडेक्ट टायटनवर काम करत आहे. मात्र, या वेंचरबाबत जास्त माहिती सार्वजनिक करण्यात आलेली नाही. हे एक कार वेंचर असून, या अंतर्गत कंपनी फ्यूचरिस्टिक कार तयार करत आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3FzjGTu