Full Width(True/False)

Netflix वापरताना असा वाचवा आपला मोबाइल डेटा, जाणून घ्या या सोप्या टिप्स

नवी दिल्लीः सध्या सोशल मीडिया सोबत ओटीटीचा वापर प्रचंड वाढला आहे. चित्रपट पाहण्यासोबत लोक घरात बसून आता ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर आपले मनपसंत शोज आणि मूव्ही पाहत आहेत. नेटफ्लिक्स आणि अमेझॉन प्राइम व्हिडिओ सारखे हे प्लॅटफॉर्म्स पेड असतात परंतु, सोबत स्ट्रिमिंग मध्ये तुमचा खूप सारा डेटा चा वापर होतो. आज आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगणार आहोत. ज्यात तुम्ही नेटफ्लिक्सचा वापर करताना तुमचा मोबाइल डेटा वाचवू शकतात. जाणून घ्या डिटेल्स. नेटफ्लिक्स अकाउंटवर डेटा स्पीड टेस्ट करा नेटफ्लिक्सवरील यूजर्संना प्रत्येक अकाउंटसाठी वेगळे डेटा सेटिंग्स सिलेक्ट करण्याचा ऑप्शन डेटा आहे. सोबत तुम्ही नेटफ्लिक्सवर आपला डेटाची स्पीड सुद्धा चेक करू शकता. तुम्ही अॅपच्या मेन्यूवर जावून अॅप सेटिंग्सच्या ऑप्शनला सिलेक्ट करून ‘डायग्नोस्टिक्स’ वर जा. त्यानंतर या ठिकाणाहून आपला डेटाची स्पीड टेस्ट करा. डेटा सेटिग्स मध्ये असा करा बदल तुम्ही नेटफ्लिक्सवर डेटा सेटिंग्स मध्ये बदल करू शकता. असे करण्यासाठी सर्वात आधी अॅप सेटिंग्स मध्ये जा. व्हिडिओ प्ले बॅक मध्ये जावून डेटा यूजेसला सिलेक्ट करा. ‘डाउनलोड डेटा सेटिंग्स’ एडजस्ट करा आणि पुन्हा आपल्या पसंतीची सेटिंग्स निवडा. नेटफ्लिक्स आपल्या यूजर्सला ऑटोमॅटिक, वाय फाय ओन्ली, सेव्ह डेटा, आणि मॅक्सिमम डेटा हे चार सेटिंग्स पैकी निवडण्याचा ऑप्शन दिसेल. व्हिडिओ क्वॉलिटीला अॅडजस्ट करा नेटफ्लिक्स पाहताना इंटरनेट सेव्ह करण्याचा सर्वात बेस्ट पद्धत म्हणजेच व्हिडिओ क्वॉलिटीला अॅडजस्ट करा. जर तुम्ही नेटफ्लिक्स पाहत असाल तर तुम्हाला आपला मोबाइल डेटा सेव्ह करायचा असल्यास तुमच्यासाठी आपली व्हिडिओ क्वॉलिटीला कमी करण्याची गरज आहे. या स्टेप्सला फॉलो करून तुम्ही नेटफ्लिक्स पाहताना इंटरनेटची बचत करू शकता. तसेच कोणत्याही अडथळ्याविना तुम्ही तुमचा फेव्हरेट शोज आणि चित्रपट पाहू शकता. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Z4VeKa