Full Width(True/False)

Apple: अ‍ॅपलची भन्नाट सर्व्हिस, आता ग्राहक स्वतः घरी दुरुस्त करू शकतील आयफोन आणि मॅक कॉम्प्युटर

नवी दिल्ली : iPhone खराब झाल्यावर आता सर्व्हिस सेंटरला जाण्याची गरज भासणार नाही. लवकर ग्राहकांना काही मॉडेल्स आणि ला स्वतः रिपेअर करण्याची म्हणजेच DIY () सुविधा देणार आहे. कंपनीची ही सेल्फ रिपेअर सर्व्हिस पुढील वर्षीपासून सुरू होईल. सुरुवातीला ही सर्व्हिस अमेरिकेसह काही ठराविक देशात सुरू केली जाईल. वाचा: Apple आयफोन आणि मॅक कॉम्प्यूटर्सला स्वतः दुरुस्त करण्यासाठी या डिव्हाइसच्या पार्ट्स आणि टूल्सला खरेदी करावे लागेल. हे टूल्स आणि पार्ट्स नवीन Apple सेल्फ सर्व्हिस रिपेअर ऑनलाइन स्टोरवरून खरेदी करता येतील. यामुळे यूजर्सला वारंवार सर्व्हिस सेंटरला जाण्याची गरज भासणार नाही. यूजर्सला स्वतःचे स्मार्टफोन आणि कॉम्प्युटर रिपेअर करण्याची सुविधा देणारा अ‍ॅपल हा पहिलाच ब्रँड ठरला आहे. DIY रिपेअर सर्व्हिस अंतर्गत सर्वात आधी आणि सीरिज डिव्हाइसचे पार्ट्स आणि टूल्स उपलब्ध केले जातील. त्यानंतर MacBook Pro 14 आणि iMac 24 चे टूल्स रोलआउट केले जातील. DIY रिपेअर्सच्या पहिल्या टप्प्यात ग्राहकांना सर्वाधिक रिपेअर केले जाणारे पार्ट्स जसे की आयफोनचा डिस्प्ले, बॅटरी, कॅमेऱ्याची सेल्फ सर्व्हिस सुविधा मिळेल. इतर पार्ट्स सेल्फ सर्व्हिससाठी कधी उपलब्ध होतील याची माहिती अद्याप दिलेली नाही. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3kIC2ti