मुंबई : 'शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या जाण्यामुळे आमच्या कुटुंबाचे व्यक्तिगत पातळीवर मोठी हानी झाली आहेच. तसेच सामाजिक क्षेत्राचीही मोठा हानी झाली आहे. त्यांच्यासारखे व्यक्तिमत्व शतकातून एकदाच होते... हे असे व्यक्तिमत्व आपल्या सर्वांसोबत होती... त्यांचे आशिर्वाद आमच्यासोबत होते हे आमचे भाग्यच होते...' अशा भावूक शब्दांत यांनी शिवशाही बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. यांनी सोमवारी पहाटे ५ वाजून ७ मिनीटांनी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ते ९९ वर्षांचे होते. बाबासाहेबांच्या निधनाची बातमी जाहीर झाल्यानंतर मराठी विश्वावर शोककळा पसरली आहे. बाबासाहेबांना सर्वच स्तरांमधून श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. ज्येष्ठ लेखक गो.नि. दांडेकर यांची नात आणि अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचे बाबासाहेबांच्या कुटुंबाशी अगदी जिव्हाळ्याचे, आपुलकीचे संबंध होते. बाबासाहेबांच्या जाण्यामुळे व्यक्तिगत पातळीवर मोठे नुकसान झाल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. मृणाल यांनी पुढे सांगितले की, ' माझ्या लहानपणापासून, पहिल्या पावलापासून त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला होता. तो आजतागायत माझ्या डोक्यावर होता. परंतु माझ्या डोक्यावरील हात आता हरपला आहे. बाबासाहेब म्हणजे चालता बोलता इतिहास होते. त्यांच्यावर देवाची कृपादृष्टी होती. असा माणूस पुन्हा होणे नाही. त्यांच्या स्मृती सतत आपल्यासोबत राहतील...' दरम्यान, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंवर गेल्या आठवड्यापासून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारावेळीच त्यांची प्राणज्योत मालवली. बाबासाहेब पुरंदरे यांचे पार्थिव पर्वती येथील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवले होते. यावेळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3qEkvpO