Full Width(True/False)

शुभांगी यांनी घेतला 'येऊ कशी..' चा निरोप, नवीन अभिनेत्री कोण

मुंबई- छोट्या पडद्यावरील मालिका '' ने फार कमी वेळात प्रेक्षकांची मनं जिंकली. मालिकेतील कलाकार आणि कथानक यांनी प्रेक्षांच्या मनात घर केलं. वेळोवेळी मालिका प्रेक्षकांकडून ट्रोल केली गेली मात्र मालिकेला प्रेक्षकांचं तितकंच भरभरून प्रेम लाभलं. परंतु, मालिकेतील शकु म्हणजेच ओमच्या आईची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत. शुभांगी यांनी नलू बनून प्रेक्षकांना आपलंस केलं. आता मात्र त्या मालिकेचा निरोप घेणार आहेत. त्याच्याजागी दुसऱ्या लोकप्रिय अभिनेत्री शकूच्या भूमिकेत दिसणार आहेत. शुभांगी यांनी त्यांच्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ पाडली. नुकत्याच पार पडलेल्या झी पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट भावी सासूचा पुरस्कार शुभांगी यांना मिळाला होता. परंतु, आता शुभांगी मालिकेचा निरोप घेणार आहेत. तर त्यांच्या जागी अभिनेत्री मालिकेत दिसणार आहेत. किशोरी शकुच्या भूमिकेत दिसणार आहेत. किशोरी या स्टार प्रवाहवरील 'सहकुटुंब सहपरिवार' या मालिकेत अंजीच्या आईच्या भूमिकेत झळकत आहेत. यासोबतच त्या आता शकुची भूमिकाही साकारणार आहेत. शुभांगी यांनी मालिकेचा निरोप घेण्यामागील कारण स्पष्ट झालं नसलं तरी मालिकेच्या कथेचा खालावलेला दर्जा आणि त्यांच्यावर चित्रित होणारा कमी भाग यामुळे त्यांनी ही मालिका सोडल्याचं बोललं जातंय. याशिवाय 'राजा राणीची गं जोडी' मालिकेत देखील शुभांगी यांची गरज असल्याने त्यांनी हा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3CGd84F