Full Width(True/False)

इंडियन आयडल मराठी कार्यक्रमाच्या सूत्रसंचलनाची धुरा सांभाळणार'ही सुरेल अभिनेत्री'

मुंबई : छोट्या पडद्यावर वेगवेगळ्या प्रकारचे रिअॅलिटी कार्यक्रम प्रसारित केले जातात. हे कार्यक्रम मालिकांइतकेच प्रेक्षकही आवडीने बघत असतात. इंडियन आयडल हा तर अनेक वर्षांपासून लोकप्रिय आहे. या कार्यक्रमातून अनेक गायकांना त्यांची कला सादर करण्याची संधी मिळाली. त्यामुळे संगीत क्षेत्रामध्ये इंडियन आयडल हा कार्यक्रम खूपच लोकप्रिय आहे. आता इंडियन आयडल हा कार्यक्रम लवकरच मराठीत येत आहे. या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून प्रसिद्ध संगीतकार जोडी अजय-अतुल जबाबदारी सांभाळणार आहेत. तर कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरी या सुरेल अभिनेत्रीकडे सोपली आहे. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आणि दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतून अभिनेत्री स्वानंदी टिकेकर घराघरात पोहोचली आहे. आता स्वानंदी पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर येण्यासाठी सज्ज झाली आहे. स्वानंदी अभिनेत्री म्हणून नाही तर सूत्रसंचालक म्हणून छोट्या पडद्यावर येत आहे. या कार्यक्रमाची सूत्रसंचालक म्हणून स्वानंदी टिकेकर पहिल्यांदाच जबाबदारी सांभाळणार आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांना तिला या भूमिकेत पाहण्याची उत्सुकता लागली आहे. इंडियन आयडलच्या निर्मात्यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून स्वानंदी सूत्रसंचालक म्हणून जबाबदारी सांभाळत असल्याचे जाहीर केले आहे. सोनी मराठीने शेअर केलेली ही पोस्ट स्वानंदी टीकेकर हिने देखील शेअर केली आहे. या पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'हे तुम्हा सर्वांसोबत शेअर करताना मला खूप आनंद होत आहे. त्याचबरोबर मी खूप उत्साही आहे..लवकरच भेटू या...' या पोस्टमध्ये पुढे लिहिले आहे की, 'सूत्रसंचालनाची धुरा सांभाळणार स्वानंदी टिकेकर! 'इंडियन आयडल मराठी'! अभिमान देशाचा, आवाज महाराष्ट्राचा! २२ नोव्हेंबरपासून, आपल्या सोनी मराठीवर. अभिनेत्री स्वानंदी टिकेकर हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे स्थान निर्माण केले आहेत. आता इंडियन आयडल मराठी कार्यक्रमाचे सूत्रसंचालक म्हणून स्पर्धक, परीक्ष आणि प्रेक्षक यांच्यातील दुवा म्हणून काम करणार आहे. स्वानंदीने अभिनेत्री म्हणून 'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेतून पदार्पण केले. या मालिकेत तिने मीनल ही भूमिका साकारली होती. स्वानंदीची आई आरती अंकलीकर टीकेकर या प्रख्यात शास्त्रीय गायिका असल्याने अभिनयाबरोबरच स्वानंदीला गाण्याची उत्तम जाण आहे. त्यामुळेच तिने सिंगीग स्टार या म्युझिकल रिअॅलिटी कार्यक्रमाचे विजेतेपद पटकावले होते. इंडियन आयडल हा कार्यक्रम सोनी टीव्हीवरून गेली अनेक वर्षे प्रसारित होत आहे. या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. प्रेक्षकांनी या कार्यक्रमाला दिलेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे हा कार्यक्रम मराठीतही आणण्याचा निर्णय वाहिनीने घेतला असून हा कार्यक्रम २२ नोव्हेंबरपासून सोनी मराठीवरून प्रसारित होणार आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2Y9CUPy