नवी दिल्ली : वापरण्यासाठी सर्वात महत्त्वाचे असते . इंटरनेटशिवाय तुम्ही स्मार्टफोनमधील अनेक कामे करू शकत नाहीत. त्यामुळे अनेकजण मोफत शोधत असतात. सार्वजनिक ठिकाणी मोफत वाय-फायची सुविधा उपलब्ध असते. मात्र, यामुळे तुमची प्रायव्हसी आणि फोनची सुरक्षा धोक्यात येते. त्यामुळे सार्वजनिक वाय-फायचा वापर करणे टाळायला हवे. वाचा: फोन हॅक होण्याचा धोका सार्वजनिक ठिकाणी वाय-फायशी फोन अथवा लॅपटॉप कनेक्ट केल्यास डिव्हाइस हॅक होण्याचा धोका असतो. डिव्हाइसला हॅक करू शकतात व तुमची खासगी माहिती, बँकिंग माहिती व इतर डेटा चोरी करू शकतात. हॅकर्स अशाप्रकारे करतात फसवणूक सायबर गुन्हेगार अनेकदा वाय-फाय पासवर्ड मोफत उपलब्ध करतात व यामुळे इतर लोक सहज कनेक्ट करू शकतील. डिव्हाइस कनेक्ट झाल्यानंतर त्याचा मॅक अॅड्रेस आणि आयपी अॅड्रेस हॅकर्सला मिळतो. यानंतर तुमचा डेटा पॅकेट्स स्वरुपात ट्रांसफर होते. हॅकर्स या पॅकेट्सला इंटरसेप्ट करून तुमची ब्राउजिंग हिस्ट्री तपासतात. तसेच, नेटवर्क स्निफिंगद्वारे व्हिजिबल ट्रॅफिक देखील इंटरसेप्ट करतात. अशाप्रकारे तुमचा डेटा त्यांच्याकडे पोहचतो. अशाप्रकारे राहा सुरक्षित
- पासवर्ड नसलेल्या कोणत्याही वाय-फायशी कनेक्ट होणे टाळा.
- सार्वजनिक वाय-फायचा वापर करत असल्यास त्यावेळी बँकिंगसंबंधी काम करू नका. यामुळे हॅकर्सकडे तुमच्या बँकेची माहिती पोहचू शकते व खाते रिकामे होईल.
- सार्वजनिक वाय-फाय वापरताना फोनद्वारे कोणतीही शेअरिंग करू नका.
- मोफत वाय-फायची विश्वासार्ह्यता तपासा, कोणत्या नावाने, कोण वापर करत आहे हे पाहा.
- सार्वजनिक वाय-फाय वापरताना ईमेल आयडीने लॉगइन करत असल्यास त्याचा ओरिजिनल पासवर्ड टाकू नका. वाय-फाय लॉगइनसाठी वेगळा पासवर्ड टाका.
- वाय-फाय वापरताना कोणत्याही प्रकारचा पासवर्ड फोनमध्ये सेव्ह करू नका.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3mX73vd