Full Width(True/False)

या दिवाळीत लोकांना मोबाइल खरेदी करणे पडले महागात, हे आहे त्यामागील कारण

नवी दिल्लीः या दिवाळी सीझन, ऑनलाइन आणि ऑफलाइन आउटलेट्स दोन्ही ठिकाणी मोबाइल फोन्स आतापर्यंत सर्वात जास्त एव्हरेज सेलिंग प्राइस (ASP) पाहायला मिळाली आहे. ही माहिती इकोनॉमिक टाइम्सच्या एका रिपोर्टमधून समोर आली आहे. रिटेलर्सला अव्हरेज सेलिंग प्राइस मध्ये १२ ते १५ टक्के वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे सप्लाय चेन संबंधित मार्केटमध्ये डिव्हाइसची कमी असल्याने किंमतीत वाढ झाली आहे. यावर्षी १९ हजार रुपयाचा एव्हरेट सेलिंग प्राइस राहिला इकोनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टमध्ये कन्सल्टेंसी फर्म काउंटरप्वाइंट रिसर्चच्या हवाल्याने म्हटले आहे या वर्षी ऑनलाइन सेल्समध्ये फोनचा एव्हरेज सेलिंग प्राइस (सर्वसाधारणपणे विक्री मूल्य) १९ हजार रुपये होता. जो गेल्या वर्षी १७ हजार रुपये होता. तर २०१९ मध्ये मोबाइलचा एव्हरेज सेलिंग प्राइस १३ हजार रुपये होता. काउंटरप्वाइंट रिसर्च मध्ये पार्टनर नील शाह यांच्या म्हणण्यानुसार, ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा या दोन्ही ठिकाणी हे हँडसेट्सचा सर्वात जास्त एव्हरेज सेलिंग प्राइस आहे. ब्रँड्सला एअरलिफ्ट करावे लागले स्मार्टफोन्स यावर्षी भारतात फेस्टिव्ह शॉपिंग सीझन ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू झाला होता. अमेझॉनने आपला ग्रेट इंडिया फेस्टिव्हल सेल आणि फ्लिपकार्टने बिग बिलियन डेज सेलची घोषणा केली होती. सेल पीरियड नुकताच संपला आहे. रिपोर्टमध्ये आयडीसी इंडिया रिसर्च डायरेक्टर नवकेंद्र सिंह यांनी म्हटले की, ब्रँड्स १० हजार रुपयांच्या खाली शानदार ऑप्शन देण्यात सक्षम नाहीत. त्यामुळे एव्हरेज सेलिंग प्राइस वाढवले आहे. किंमत वाढीला सप्लाय चेन संबंधित मुद्दे होते. शिपिंग कंटेनर्सच्या शॉर्टेज मुळे ब्रँड्सला फोन एअरलिफ्ट करावे लागले. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3D0H5wf