Full Width(True/False)

ओटीटीवर प्रदर्शित झालेले हे पाच सर्वोत्तम सिनेमे!; तिस-या क्रमांकाचा सिनेमा नक्की बघा

मुंबई : ओटीटी प्लॅटफॉर्मवर सिनेमा आणि वेब सीरिज बघणा-यां प्रेक्षकांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळेच अनेक सिनेमे ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केले जात आहेत. करोना काळामुळे ओटीटीवर सिनेमे प्रदर्शित होण्याचे प्रमाण वाढले होते. परंतु आता करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे सिनेमागृह हळूहळू सुरू होत आहे. परंतु तरी देखील ओटीटी प्लॅटफॉर्मची क्रेझ कमी झालेली नाही. उलट अजूनही काही सिनेमे ओटीटीवर प्रदर्शित होत आहेत. अलिकडेच नेटफ्लिक्सवर कार्तिक आर्यनचा 'धमाका' हा सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमात कार्तिकसोबत मृणाल ठाकूर आहे. आतापर्यंत ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या सिनेमांतील हे पाच सिनेमे प्रत्येकाने आवर्जून बघायलाच हवे... रश्मि रॉकेट तापसी पन्नू हिचा हा सिनेमा झी ५ ओटीटीवर रिलीज झाला आहे. रश्मि रॉकेट या सिनेमात तापसीसह श्वेता त्रिपाठी, अभिषेक बॅनर्जी, प्रियांषु पेनयुली आणि सुप्रिया पाठक हे कलाकार आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शन आकर्ष खुराना यांनी केले आहे. ओटीटीवर प्रदर्शित झालेला हा सिनेमा प्रेक्षकांना खूप आवडला आहे. विक्की कौशल याची प्रमुख भूमिका असलेला सरदार उधम हा सिनेमा अॅमेझॉन या ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. 'सरदार उधम' सिनेमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. तसेच समीक्षकांनी देखील सिनेमाचे भरभरून कौतुक केले आहे. या सिनेमातील कलाकरांच्या निवडीवर निर्माता-दिग्दर्शकांनी खूप मेहनत घेतली होती. त्याचा परिणाम हा सिनेमा पाहताना दिसतो... जय भीम सूर्या यांच्या या सिनेमाचे करावे तितके कौतुक कमी आहे. जर अजून तुम्ही हा सिनेमा पाहिला नसेल तर आवर्जून तो बघा. समीक्षकांनीही या सिनेमाचे खूप कौतुक केले आहे. मीनाक्षी सुंदरेश्वर नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या 'मीनाक्षी सुंदरेश्वर' या सिनेमाचे कथानक नवविवाहित दांपत्याच्या आयुष्यावर आधारित आहे. या सिनेमात लॉंग डिस्टनस रिलेशनशिप, करिअर निवडण्याला दिलेले प्राधन्य, त्यामुळे समोर आलेली आव्हाने दाखवली आहेत. या सर्वांना हे नवविवाहित दांपत्य कसे सामोरे जाते हे दाखवले आहे. सान्या मल्होत्रा आणि अभिमन्यू दासानी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव आणि कृति सेनन यांचा 'हम दो हमारे दो' हा सिनेमा डिस्ने हॉट स्टारवर प्रदर्शित झाला आहे. कॉमेडी रोमँटिक सिनेमात राजकुमार, कृति यांच्याशिवाय परेश रावल, रत्ना पाठक आणि अपराशक्ती खुराना यांच्या प्रमुख भूमिका आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/32fnNFX