Full Width(True/False)

महेश मांजरेकरांच्या बोलल्यामुळे दुखावलेल्या विशालने घेतला मोठा निर्णय

मुंबई- '' सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. या आठवड्यात घरातील सदस्यांमध्ये अनेक राडे झाले. जय आणि विकास यांच्यात जोरदार भांडण झालं तर टास्कदरम्यान सोनालीने मीराला कोल्हापुरी दणका दाखवत चारीमुंड्या चीत केलं. दुसरीकडे गायत्रीला टास्कदरम्यान दुखापत झाली आणि त्याचं टीम ए ने भांडवल केलं. या संपूर्ण प्रकारानंतर विशाल निकमआणि मीनल यांच्यातही वाद झाले. या आठवड्याच्या बिग बॉसच्या चावडीवर महेश मांजरेकर यांनी याचं गोष्टीवरून विशालला दहावा नंबर दिला. मांजरेकर यांनी विशाल सोनाली आणि मीनलसोबत व्यवस्थित वागत नसल्याचं म्हटलं. त्यानंतर मात्र मांजरेकर यांच्या बोलण्याने दुखावलेल्या विशालने मोठा निर्णय घेत सगळ्यांना धक्का दिला. मांजरेकर विशालला समजावत म्हणाले, 'तू सोनाली आणि मीनलसोबत असा का बोलतोस? का तू त्यांना कमी समजतोस? त्या स्वतःचा गेम खेळतायत. तू त्यांना सुधारायला का जातोस? तुझं बोलणं खूप वाईट असतं. ते तसं दिसतं. तू सोनाली आणि मीनल यांच्यासोबत तुसडेपणाने का बोलतोस?' यावर विशाल मांजरेकरांना म्हणतो, 'माझ्या ग्रुपमधील एखादा व्यक्ती चुकत असेल तर मी त्याला समजवायला नको का?' परंतु, यावरही मांजरेकर विशालला सुनावतात. त्यामुळे विशाल दुखावला जातो आणि यापुढे कोणत्याचं टीमसोबत खेळणार नसल्याचं म्हणतो. विशाल एकटा बसलेला असताना म्हणतो, 'जवळची माणसचं जास्त त्रास देतात. हे नाही सहन होत आता. माझं इथे कुणी नाहीये, मी कोणत्याचं ग्रुपचा हिस्सा नाहीये. आजपासून, आतापासून.' विशालच्या या निर्णयाचा त्याचे चाहतेही विरोध करताना दिसतायत. मात्र विशालच्या या निर्णयामुळे त्याला घरात आणखी अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. यापुढे विशाल कसा खेळणार याकडे आता प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3lhdqbB