Full Width(True/False)

दोनच शब्दात स्वरा भास्करचा विक्रम गोखलेंवर निशाणा; म्हणाली...

मुंबई: अभिनेत्री हिनं ‘१९४७ चे स्वातंत्र्य भीक मागून मिळाले होते. खरे स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळाले,’ असे निंदनीय वक्तव्य करून संपूर्ण देशासह स्वातंत्र्यसैनिक, हुतात्म्यांचा अपमान केला आहे. त्यामुळं तिला देण्यात आलेला पद्मश्री पुरस्कार परत घेऊन तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी होत असतानाच ज्येष्ठ अभिनेते यांनी कंगनाच्या वक्तव्याशी सहमत असल्याचं म्हटलं आहे. यानंतर अनेकांनी गोखले यांच्यावर निशाणा साधला आहे. अभिनेत्री हिने देखील विक्रम गोखले यांच्यावर निशाणा साधला आहे. विक्रम गोखले यांनी पुण्यात एका कार्यक्रमात पत्रकारांशी बोलत असताना कंगनाच्या मताशी सहमत असल्याचं म्हणत विधानाचा पुनरुच्चार केला. यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओ शेअर करत स्वरा भास्करनं विक्रम गोखले यांच्यावर खोचक शब्दात टीका केली आहे. 'पद्म पुरस्कार येतायत; असं स्वरा भास्कर म्हणाली. नेमकं काय म्हणाले विक्रम गोखले?‘अनेक स्वातंत्र्यसैनिक फाशी जाताना देशातील मोठ मोठे लोक बघत राहिले. त्यांना कोणी वाचवले नाही. ब्रिटिशांविरोधात लढणाऱ्या लोकांना वाचवले पाहिजे होते. आमच्या पैशाचे काय करता हे प्रत्येक सरकारला विचारले पाहिजे. देशातील सर्व राजकीय पक्ष फायद्यासाठी हिंदू-मुस्लिम, मराठा-ब्राह्मण, मराठा-दलित, दलित-ब्राह्मण यांच्यात तेढ निर्माण करतात,’ अशी टिप्पणी गोखले यांनी पत्रकारांशी बोलताना केली होती. तर हिंदूंमध्ये जाणीवपूर्वक तेढ निर्माण केली जात आहे. आपण हे उघड्या डोळ्यांने पाहात आहोत. भारताचा इतिहास बाबर आणि अकबर यांच्यापर्यंत मर्यादित नाही. माझ्या देशाला घातक नसलेले सगळे लोक आपले आहेत. भारत देश भगवाच राहिला पाहिजे,’असंही गोखले यांनी यावेळी म्हटलं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3ox4wHI