मुंबई- बॉलिवूड सुपरस्टार आणि आयुष शर्मा यांच्या अभिनयाने सजलेला 'अंतिम: द फायनल ट्रुथ' हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला. सलमानच्या इतर चित्रपटांच्या मानाने या चित्रपटाची कमाई फार कमी असली तरी चाहत्यांमध्ये चित्रपटाचा चांगलाच बोलबाला आहे. या चित्रपटात सलमान आणि आयुष वेगळ्याच अंदाजात दिसत आहेत. चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर सलमानने ''च्या चित्रीकरणादरम्यान आलेल्या अडचणी चाहत्यांसोबत शेअर केल्या आहेत. नुकत्याच इटाईम्सला दिलेल्या मुलाखतीत सलमानने त्याच्या चित्रपटाच्या अनुभवाबद्दल सांगितलं. चित्रपटातील ही भूमिका अत्यंत वेगळी असून ती साकारताना सलमानला देखील दडपण आलं होतं. सलमान म्हणाला, 'मी मनात ठरवलेलं की चित्रपटात मला ही भूमिका कशी साकारायची आहे. मला ही तशी साकारायची होती जशी ती मला सांगितली गेली. पण जेव्हा मी भूमिकेचं चित्रीकरण सुरू केलं तेव्हा टेन्शन यायला लागलं. मला वाटलं मी हे नाही करू शकत. जेव्हा मी आयुषला त्याची भूमिका दमदार पद्धतीने साकारताना पाहिलं. तेव्हा माझ्या मनात आत्मविश्वास निर्माण झाला की मी सुद्धा हे करू शकतो.' सलमान पुढे म्हणाला, 'आमची दोघांची पात्र खूप वेगळी आहेत. त्यामुळे आम्ही एकमेकांसारखा अभिनय करून चालणार नव्हतं. आम्हाला याची जाणीव झाली होती. आयुषचं पात्र खूप दमदार होतं पण त्याच्यात खूप राग होता. तर माझं पात्र देखील दमदार होतं पण तो सगळं हसून करणारा होता. जर मी एखाद्याच्या चेहऱ्यावर पाणी जरी फेकलं तरी मी ते हसत हसत करेन. त्यामुळे मला या पात्राची ताकद माहीत होती. मला हे पात्र साकारायला मजा आली.' सलमान आणि आयुषच्या 'अंतिम' ने आतापर्यंत फक्त २० कोटींची कमाई केली आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3IdUZOT