Full Width(True/False)

बँकेत जाण्याची गरजच नाही! स्मार्टफोनच्या एका क्लिकवर मिळेल ५ लाखांचे कर्ज, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली : नवीन गाडी खरेदी करायची असो अथवा नवीन घर, मोठ्या रक्कमेच्या वस्तूंसाठी सर्वचजण ईएमआयचा पर्याय निवडतात व मोठी रक्कम असल्याने आपल्याला बँकेकडून कर्ज घ्यावे लागते. बँकेत वारंवार जाऊन देखील कर्ज मिळेलच याची खात्री नसते. मात्र, आता कर्जासाठी बँकत जाण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या स्मार्टफोनच्या मदतीने कर्ज घेऊ शकता. वाचा: स्मार्टफोनद्वारे काही अ‍ॅप्सच्या मदतीने तुम्हाला सहज कर्ज मिळेल. विशेष म्हणजे या अ‍ॅप्सवर कर्जाला परवानगी मिळण्यासाठी जास्त कालावधीही लागत नाही. गुगल प्ले स्टोरवर उपलब्ध अशाच काही चांगल्या अ‍ॅप्सबाबत जाणून घेऊया. धनी अ‍ॅपला तुम्ही गुगल प्ले स्टोरवरून डाउनलोड करू शकता. ज्या लोकांना कमी रक्कमेचे कर्ज हवे आहे, अशांसाठी लवकरात लवकर सर्व कागदपत्रांचे काम पूर्ण होऊन त्वरित कर्ज मिळते. हे अ‍ॅप विमा, क्रेडिट कार्ड इत्यादी सुविधा देखील पुरवते. या अ‍ॅपला ५० मिलियनपेक्षा अधिक वेळा डाउनलोड केले आहे. नवी नवी देखील इंस्टंट लोन देणारे अ‍ॅप आहे. याद्वारे सहज कर्ज उपलब्ध होते. हे अ‍ॅप सर्वातआधी माहिती व्हेरिफाय करते व त्यानंतर पात्र असल्यावर कर्ज पुरवते. या अ‍ॅपला १० मिलियनपेक्षा अधिक वेळा डाउनलोड केले आहे. मनी व्ह्यू अ‍ॅपद्वारे ग्राहकांना ५ लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळते. मात्र, यासाठी तुम्ही पात्र असणे गरजेचे आहे. या अ‍ॅपद्वारे तुम्ही घरबसल्या कर्ज घेऊ शकता व त्यानंतर ईएमआयच्या माध्यमातून कर्ज फेडता येईल. मनी टॅप मनी टॅप देखील अगदी सोप्या प्रक्रियेंतर्गत कर्ज देणारे अ‍ॅप आहे. या अ‍ॅपद्वारे ग्राहकांना कर्ज मिळण्यास जास्त समस्या येत नाही. अ‍ॅपला १० मिलियनपेक्षा अधिक वेळा डाउनलोड करण्यात आले आहे. दरम्यान, कोणत्याही अ‍ॅप्सचा वापर करण्यापूर्वी संपूर्ण माहिती घ्यावी. तसेच, त्यासंदर्भातील अटी व नियमांची माहिती घेऊन खात्री पटल्यावरच वापर करावा. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3BZv4Wv