नवी दिल्ली : M4 Pro 5G सोबत, हँडसेट निर्माता Poco ने मूनलाईट सिल्व्हर कलर व्हेरिएंट ग्राहकांसाठी सादर केला आहे. याआधी Poco F3 स्मार्टफोनचे तीन कलर व्हेरिएंट लाँच केले गेले आहेत. जाणून घ्या Poco F3 मूनलाईट सिल्व्हर व्हेरिएंटच्या किंमतीपासून ते फिचर्सपर्यंत सविस्तर माहिती. वाचा: Poco F3 डिस्प्ले: Poco F3 मूनलाइट सिल्व्हर व्हेरिएंटमध्ये १२० Hz रिफ्रेश रेटसह ६.६७ -इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यूशन २४००x१०८० पिक्सेल आहे. फोन HDR10 Plus आणि १३०० nits पीक ब्राइटनेससह येतो. संरक्षणासाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ५ वापरण्यात आला आहे. Poco F3 प्रोसेसर: वेग आणि मल्टीटास्किंगसाठी क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 870 5G प्रोसेसरसह ग्राफिक्ससाठी Adreno 650 GPU आहे. Poco F3 कॅमेरा: फोनच्या मागील बाजूस तीन रियर कॅमेरे, ४८ मेगापिक्सेलचा प्राथमिक कॅमेरा, ८ मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि ५ मेगापिक्सेल मॅक्रो कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फीसाठी २० मेगापिक्सेल कॅमेरा सेन्सर फोनच्या पुढील बाजूस आहे. Poco F3 बॅटरी: फोनला अधिक पॉवरफुल बनविण्यासाठी ४५२० mAh मजबूत बॅटरी उपलब्ध आहे, जी ३३ W क्विक चार्ज ३ प्लस फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. Poco F3 किंमत : Poco F3 चा नवीन कलर व्हेरिएंट मूनलाईट सिल्व्हर कलर लाँच झाला आहे, याआधी फोनचे आर्क्टिक व्हाइट, डीप ओशन ब्लू आणि नाईट ब्लॅक शेड्स आहेत. नवीन कलर व्हेरिएंट ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटसह लाँच करण्यात आला आहे. या मॉडेलची किंमत EUR ३२९ (अंदाजे रु. २८,२०० ) आहे. या Poco मोबाईल फोनच्या ६ GB रॅम आणि १२८ GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत EUR २९९ (सुमारे २५,६०० रुपये) आहे. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3kIaTqD