नवी दिल्लीः ऑनलाइन डेटा चोरी आणि फसवणुकीत वाढ होत आहे. गुगल प्ले स्टोरवर असे अनेक अॅप्स आहेत. जे खूपच धोकादायक आहेत. गुगलने असे अनेक अॅप्सवर बंदी घातली आहे. आता पुन्हा एकदा गुगलने अशाच अॅप्सवर बंदी घातली आहे. हे सर्वात धोकादायक अॅप्स समजले जातात. गुगलने अशा ७ अॅप्समध्ये मेलवेयर मिळाल्यानंतर त्यांना प्ले स्टोरवरून हटवले गेले आहे. कास्पर्सकी (Kasperskey) च्या तात्याना शिश्कोवा (Tatyana Shishkova) ने जोकर मेलवेयर (Joker Malware) ला हायलाइट केले आहे. तात्यानाने या ७ अॅप मेलवेयर जसे ट्रोजन जोकरने ग्रस्त होते. अनेक लोकांनी अॅप्स केले आहे डाउनलोड अनेक स्क्विड गेम यूजर्सला सायबर गुन्हेगारांकडून मेलवेयर सोबत याच पद्धतीने हल्ल्यांचा सामना करावा लागत होता. फ्लॅग करण्यात आल्यानंतर गुगल ने प्ले स्टोरवरून अॅप्सला हटवले आहे. यात चिंता करणारी गोष्ट म्हणजे लोकांनी या अॅप्सला आधीच डाउनलोड केलेले आहे तसेच याचा वापर सुद्धा करीत आहेत. डेटा बेस प्रायव्हसी वाचवण्यासाठी तत्काळ डिलीट करा हे अॅप्स आपल्या स्मार्टफोनची एकदा चांगली तपासणी करा. या सात अॅप्सपैकी कोणताही एक अॅप तुमच्या फोनमध्ये असल्यास तत्काळ त्या अॅपला आपल्या फोनमधून डिलीट करा. असे केले तरच तुमचा डेटा सुरक्षित राहील. गुगलकडून या ७ धोकादायक अॅप्सवर बंदी १. Now QRcode Scan (10,000 हून जास्त इंस्टॉल) २. EmojiOne Keyboard (50,000 हून जास्त इंस्टॉल) ३. Battery Charging Animations Battery Wallpaper (1,000 हून जास्त इंस्टॉल) ४. Dazzling Keyboard (100 हून जास्त इंस्टॉल) ५. Volume Booster Louder Sound Equalizer (100 हून जास्त इंस्टॉल) ६. Super Hero-Effect (5,000 हून जास्त इंस्टॉल) ७. Classic Emoji Keyboard (5,000 हून जास्त इंस्टॉल) फेक सब्सक्रिप्शनने लावला जातोय चुना यात सर्वात धोकादायक बाब म्हणजे सर्वसामान्या मेलवेयर हल्ल्यात फेक सब्सक्रिप्शन आणि या अॅपच्या माध्यमातून अवैध पैसे कमावण्यासाठी लक्ष्य केले जाते. त्यामुळे यूजर्संनी अधिक अलर्ट राहणे गरजेचे आहे. कोणतीही संशयीत लिंक वाटत असल्यास तिला ओपन न करणे हे फायद्याचे ठरते. गेमिंग अॅप्सवरून लोकांची फसवणूक केली जात आहे. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3Hot0LH