मुंबई- गेलं दीड वर्ष करोना साथीमुळे प्रत्येकजण भीतीच्या सावटाखाली होतं. सण साजरे करण्यावरही अनेक नियम आणि अटी लागू होत्या. मात्र आता करोनाचा प्रभाव कमी होऊ लागल्याने जनजीवन थोड्याफार प्रमाणात का होईना सुरळीत होत आहे. प्रत्येक सण साजरा करण्यासाठी उत्साह वाटू लागला आहे. दिवाळी म्हटली की फराळ आला. पणत्या, कंदील आणि रांगोळ्यादेखील आल्या. प्रत्येकाच्या आयुष्यात नवचैतन्याची लहर आणणारा हा सण. आता प्रत्येकजण खुल्या मनाने दिवाळी साजरी करत आहे. आणि त्यांचा हा आनंद वाढवण्यासाठी कलाकारही कामाला लागले आहेत. अनेक मराठी कलाकारांनी आपल्या लाडक्या चाहत्यांना दिवाळीच्या भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. छोट्या पडद्यावरील कलाकार असोत किंवा मोठ्या पडद्यावरील चाहत्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी अनेक अभिनेत्रींनी वेगवेगळ्या पोजमध्ये फोटोशूट देखील केलं आहे. करोनाचं सावट कायमचं जाऊदे आणि सगळ्यांना सुखाचे, भरभराटीचे आणि समृद्धीचे दिवस येउ दे अशी प्रार्थना कलाकार त्यांच्या चाहत्यांसाठी करत आहेत. पाहूया आपल्या लाडक्या कलाकारांचे दिवाळी स्पेशल फोटो.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3q30oRV