मुंबई- शाहरुख खानने स्वतःच्या अभिनय कौशल्याच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपली एक नवीन ओळख निर्माण केली. एका मध्यमवर्गीय कुटुंबातून येऊन कोणतीही अभिनयाची पार्श्वभूमी नसताना फक्त आपल्या मेहनतीवर आणि अभिनय कौशल्यामुळे त्याने स्वतःची ओळख निर्माण केली. यामुळेच त्याच्यावर लाखो चाहते भरभरून प्रेम करतात. त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी बाहेर दरवर्षी येतात. २ नोव्हेंबर रोजी शाहरुख खानचा वाढदिवस असतो. दरवर्षी तो अगदी धुमधडाक्यात वाढदिवस साजरा करतो. परंतु या वर्षी त्याने आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला. त्याच्या या निर्णयाने काही चाहते निराशही झाले. असं म्हटलं जातं की, शाहरुखने वाढदिवस साजरा न करण्यामागे होता. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने ड्रग्ज केसमध्ये अटक केल्याचं संपूर्ण प्रकरण ताजं असल्यामुळे शाहरुखने वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला. नुकताच ५६ वर्षांचा झाला. त्याचे चाहते वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मन्नत बाहेर जमा झाले होते. सालाबादप्रमाणे चाहते मन्नत बाहेर जमा होतात आणि शाहरुखही बंगल्याच्या बाहेर येऊन चाहत्यांची भेट घेतो. मागच्या २० वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा या वर्षी शाहरुख खानने तोडली आहे. व्हायरल झालेल्या फोटो आणि व्हिडिओमध्ये मन्नत बाहेर शाहरुखला शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांची गर्दी दिसते. काही चाहते सकाळपासून ते रात्रीपर्यंत आपल्या आवडत्या कलाकाराची एक झलक दिसावी म्हणून उभे राहिलेले दिसतात. पण, शाहरुख खान यंदाच्या वर्षी चाहत्यांच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी बाहेर आलाच नाही. असं म्हटलं जातं की, आर्यन खानला ड्रग्ज केसमध्ये अटक झाल्यानंतर किंग खान आणि त्याचे कुटुंब अडचणीत आले होते. २८ दिवस तुरुंगात राहिल्यामुळे आर्यनला खूप कटू अनुभवांना सामोरे जावे लागते होते. आर्यनचा एक दोनदा नाही तर तीन वेळा जामीन नाकारण्यात आला होता त्यामुळे शाहरुखसह संपूर्ण खान कुटुंब चिंतेत होतं. आता आर्यनला जामीन मिळाल्यानंतर कटू आठवणी विसरण्यासाठी किंग खान आणि त्याचं कुटुंब प्रयत्न करत आहे. त्यामुळेच शाहरुखने आपला वाढदिवस साजरा केला नाही असे सांगण्यात येत आहे. आर्यन खान याला या कटू आठवणी विसण्यास मदत व्हावी यासाठी किंग खानने आपल्या जवळच्या मित्रांना ही वाढदिवसाला घरी न येण्याचे सांगितले होते.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3bFChQZ