Full Width(True/False)

'सूर्यवंशी' मुळे वाढली पाकिस्तानच्या राष्ट्रपतींची भीती

मुंबई- बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याचा नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट '' सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालतोय. चित्रपटाने १०० कोटींचा टप्पा केव्हाच ओलांडला असून लवकरच हा चित्रपट २०० कोटींच्या घरात पोहोचणार आहे. परंतु, 'सूर्यवंशी' चित्रपटामुळे पाकिस्तानच्या राष्ट्रपतींच्या चिंतेत वाढ झाली आहे. पाकिस्तानचे राष्ट्रपती यांच्यासोबत पाकिस्तानी अभिनेत्री हीने देखील 'सूर्यवंशी' चित्रपटावर आक्षेप घेतला आहे. चित्रपटातील खलनायकाचं नाव मुस्लिम का आहे, त्यामुळे भारतात इस्लामोफोबिया वाढेल असं त्यांचं म्हणणं आहे. पाकिस्तानचे राष्ट्रपती आरिफ यांनी चित्रपटाबद्दल बोलताना म्हटलं, 'या प्रकारचा कण्टेट भारतातील इस्लामोफोबियाला आणखी हवा देईल. मला आशा आहे की भारतीय जनता अशा प्रकारच्या गोष्टी योग्य रीतीने हाताळतील.' यासोबतच पाकिस्तानी अभिनेत्री मेहविशने देखील ट्विट करत लिहिलं, 'सूर्यवंशी बॉलिवूडचा तो चित्रपट आहे जो इस्लामोफोबिया वाढवतोय. हा ट्रेण्ड हॉलीवूडमधून सुरू झाला होता. जर आपण चित्रपटात मुस्लिम व्यक्तिरेखेला सकारात्मक दाखवू शकत नाही तर निदान त्याच्यासोबत न्याय तरी करू शकतो.' यापूर्वी चित्रपटातील मुस्लिम खलनायकावरून बराच वाद उफाळून आला होता. त्यावर चित्रपटाचा दिग्दर्शक रोहित शेट्टी याने स्पष्टीकरण देत म्हंटल, 'जर माझ्या चित्रपटाचा खलनायक हिंदू असता तर हे प्रश्न विचारले गेले असते का? जर पाकिस्तान मधून दहशतवादी भारतात येत असतील तर त्यांचं आपण काय नाव ठेवतो? त्यांचा काय धर्म असतो? चित्रपटाची कथाच यावर आधारित आहे की पाकिस्तानातून दहशतवादी येतात आणि त्यांना आपले पोलीस ऑफिसर पकडतात.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2ZiC7wp