नवी दिल्ली: देशातील सुप्रसिद्ध नेटवर्क प्रदाता कंपन्या Airtel, Jio आणि Vodafone Idea अतिशय स्वस्त प्रीपेड रिचार्ज प्लान ऑफर करतात. खाजगी क्षेत्रातील कंपन्या ग्राहकांना खूप कमी लाभ देतात. बहुतेक प्लानची वैधता कमी असते किंवा ते सध्याच्या प्लानच्या वैधतेनुसार काम करतात. परंतु, यादरम्यान सरकारी मालकीची नेटवर्क प्रदाता कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) काही वेगळे फायदे देत आहे. बीएसएनएलच्या या प्लानवर एक नजर टाकूया. वाचा: आज आम्ही तुम्हाला च्या अतिशय फायदेशीर प्लानची माहिती देत आहोत. या प्लानची किंमत ४० रुपयांपेक्षा कमी आहे. त्याच वेळी, वैधतेच्या बाबतीत, या प्लानची वैधता अर्धा महिना म्हणजे १५ दिवस आहे. BSNL चा ३६ रुपयांचा प्रीपेड प्लान : बीएसएनएलच्या ३६ रुपयांच्या प्रीपेड प्लानमध्ये युजर्सना ३६ रुपयांचा टॉकटाइम दिला जातो. त्याच वेळी, व्हॉईस कॉलिंगबद्दल सांगायचे , तर यामध्ये BSNL ते BSNL कॉलिंगसाठी २५० मिनिटे उपलब्ध आहेत. दिलेला टॉकटाइम इतर नेटवर्कवर कॉल करण्यासाठी वापरला जाऊ शकतो. यासाठी प्रतिसेकंद एक रुपये १ पैसे शुल्क आकारले जाते. या प्लानमध्ये दैनंदिन वापरासाठी २०० MB डेटा डेटा फायदे म्हणून उपलब्ध आहे. या मध्ये १५ दिवसांसाठी २०० MB डेटा तुम्हाला वापरता येईल. BSNL च्या या प्लानमध्ये मोफत एसएमएस उपलब्ध नाही, मात्र ५ पैसे प्रति एसएमएस दराने एसएमएस सुविधा उपलब्ध आहे. इतकेच नाही तर इतर टेलिकॉम कंपन्या १०० रुपयांपेक्षा कमी किमतीत मोफत एसएमएसचा लाभही देत नाहीत. हा प्लान युजर्ससाठी ५० रुपयांपेक्षा कमी किमतीमध्ये एक मस्त पर्याय आहे. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3c7YDL7