मुंबई- आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री बॉलिवूडमधील हिट अभिनेत्रींपैकी एक आहे. तापसीने तिच्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये वेगळं स्थान निर्माण केलं. तापसी बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींच्या यादीत आहे. तापसीने अनेक महिलांवर आधारित चित्रपटात काम केलं. परंतु, अनेक मोठे अभिनेते तापसीसोबत काम करायला तयार नसल्याची खंत तिने एका मुलाखतीत बोलून दाखवली. अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांसारख्या बड्या अभिनेत्यांसोबत काम केल्यानंतरही तापसीसोबत बॉलिवूडमध्ये भेदभाव केला जात असल्याचं तिचं म्हणणं आहे. बॉलिवूडबद्दल बोलताना तापसी म्हणाली, 'एका अभिनेत्याने माझ्यासोबत काम करायला नकार दिला कारण त्यात माझा डबल रोल होता. त्याचं म्हणणं होतं की इथे एकच तापसीला सांभाळणं अवघड आहे तिथे तर दोन तापसी आहेत. एका अभिनेत्याला माझ्यासोबत चित्रपटात काम दिलं गेलं. आम्ही याआधी एकत्र काम केलं होतं. पण तरीही त्या अभिनेत्याने हे सांगत नकार दिला की या चित्रपटात सगळी सहानुभूती त्या मुलीच्या भूमिकेला मिळणार आहे. पण खरं तर यापूर्वी त्या अभिनेत्याने अशा चित्रपटात काम केलं होतं. पण आता त्याने नकार दिला.' पुढे तापसी म्हणाली, 'प्रत्येकवेळी जेव्हा मी निर्मात्यांसोबत बसते तेव्हा माझ्यासोबत काम करण्यासाठी अशा अभिनेत्यांची नावं असतात ज्यांनी फक्त एक किंवा दोन चित्रपटात काम केलं आहे. पण तेदेखील माझ्यासोबत काम करायला नकार देतात. त्यांना महिलांवर आधारित चित्रपटात काम करायचं नसतं. त्यांना अशा चित्रपटात काम करायचं नसतं ज्यात त्यांची फक्त १० टक्के भूमिका असते. त्यांना बॉलिवूडमधील वातावरणाने हे समजावलं आहे कि अशा चित्रपटात काम करायचं नाही.' नुकताच तापसीचा 'रश्मी रॉकेट' प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यानंतर तापसी 'शाब्बास मिठू', 'लूप लपेटा' आणि 'दोबारा' या चित्रपटात झळकणार आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3EGDq7i