Full Width(True/False)

फराळ,पहिली अंघोळ, लक्ष्मीपूजन, पाडवा...आली मालिकांमध्ये ही दिवाळी

गौरी आंबेडकर, एसएनडीटी विद्यापीठ या सणासाठी लहान-मोठे सगळेच खूप आतुर असतात. हेच आनंदाचं आणि उत्साहाचं प्रतिबिंब मालिकांमध्येही दिसणार आहे. 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत ऑफिसमध्ये दिवाळीची पूजा आहे. आजोबांपासून परीपर्यंत सगळी मंडळी एकत्र जमून फराळाचा आस्वाद घेणार आहेत. 'कुसुम' या मालिकेत दिवाळीत लग्नाची लगबग पाहायला मिळणार आहे. कुसुमचा लग्नसोहळा अगदी तोंडावर आल्यामुळे दिवाळी आणि लगीनघाई असा हर्षोत्सवाचा डबल धमाका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 'सुख म्हणजे नक्की काय असतं'मधील शिर्केपाटील कुटुंबात यंदा दिवाळी अगदी साधेपणानं साजरी होणार आहे. संकटाशी दोन हात करत आपल्या माणसांच्या प्रेमळ साथीनं दिवाळी साजरी होणार आहे. तर 'सोन्याची पावलं' या मालिकेत इनामदार कुटुंबाला ऐन दिवाळीत त्यांचं राहतं घर सोडावं लागणार आहे. एका पणतीच्या प्रकाशात दीपोत्सव साजरा करण्याची वेळ त्यांच्यावर येणार आहे. एकूणच दिवाळीत वेगवेगळ्या चवींचं फराळाचं ताट मालिका प्रेक्षकांसाठी घेऊन येणार आहेत. ऐन दिवाळीत टीआरपीसाठी चांगलीचं रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. नायक-नायिकांचा पाडवा आणखी एक आकर्षणाचा विषय असणार आहे. 'सुंदरा मनामध्ये भरली', 'अजूनही बरसात आहे', 'राजा रानीची गं जोडी', '' या मालिकांमध्ये पाडव्याची ओवाळणी होणार आहे. भेटवस्तू आणि सरप्राइजेसच्या माध्यमातून अनेक लपवलेली गुपितंही समोर येणार आहेत. 'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं', 'ठिपक्यांची रांगोळी', 'मन उडू उडू झालं' या मालिकांमध्ये दिवाळीत अनोख्या ट्विस्ट्सची आतषबाजी होणार आहे. 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं'मध्ये गायीची पूजा करून वसुबारस साजरा होणार आहे. तर काही वाहिन्यांवरील कलाकार एकत्र जमून गप्पागोष्टी, अंताक्षरी खेळत दीपोत्सव साजरा करणार आहेत. 'सहकुटुंब सहपरिवार'मध्ये पश्याची तुरुंगातून सुटका होणार का हे पाहण्यासाठी दिवाळीची वाट पाहावी लागेल. 'रंग माझा वेगळा'मधील दीपा आणि कार्तिकी दिवाळीत त्यांच्या हक्काच्या घरी परत जाणार का, हे पाहण्यासाठीसुद्धा प्रेक्षक आतुर आहेत. मालिकांमधील दिवाळी उत्सुकता वाढवणारी आणि उत्साहानं भरलेली असणार आहे. 'जीव माझा गुंतला' या मालिकेत मल्हार आणि अंतरामधील डावपेचांची गमतीशीर जुगलबंदी दिवाळीत पाहायला मिळणार आहे. अंतरा मल्हारला रात्रभर जागून करंज्या करायला बसवणार आहे. यादरम्यान परस्परांमधील नातं नकळत कसं फुलतं हे पाहणं प्रेक्षकांसाठी रंजक असणार आहे. - अजय कुरणे (दिग्दर्शक - जीव माझा गुंतला) दिवाळसणासाठी देशपांडे कुटुंबातील बाबा गावाहून घरी परत येणार आहेत. इंद्राला दिपू आवडू लागली आहे. यंदा दिवाळीत दिपूला एखादं खास सरप्राइज देण्याचा त्याचा मानस आहे. दोन्ही कुटुंबात आनंदानं दीपोत्सव साजरा होणार आहे. - (दिग्दर्शक - मन उडु उडु झालं) 'ठिपक्यांची रांगोळी' या मालिकेत अपूर्वा पहिल्यांदा एकत्र कुटुंबात राहून दिवाळी साजरी करणार आहे. पूजा करणं, लाडू बनवणं, रांगोळी काढणं या सगळ्यात तिचा सहभाग आहे. मला दिवाळीचे सीन्स लिहिताना खूप मजा आली. कुटुंबातील निरनिराळी व्यक्तिमत्त्व दीपावलीत एकत्र येऊन खूप धमाल करणार आहेत. - मनस्विनी लता रविंद्र (लेखक - ठिपक्यांची रांगोळी)


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3bCE3SQ