Full Width(True/False)

'भीक म्हणून मिळालं स्वातंत्र्य' वक्तव्यामुळे कंगना रणौत अडचणीत

मुंबई- नुकतीच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित अभिनेत्री स्वातंत्र्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे अडचणीत आली आहे. कंगनाने भारताला दिलेल्या स्वातंत्र्याचे वर्णन 'भीक' असे केले होते, त्यामुळे अभिनेत्रीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या टाइम्स नाऊ समिटमध्ये कंगनाने म्हटले होते की, भारताला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळालं नाही, तर ते भीक मागून मिळालं आणि जे स्वातंत्र्य मिळाले ते २०१४ मध्ये मिळालं. कंगना रणौतचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या वक्तव्यात कंगनाने भाजप सरकारचा उल्लेख केला होता. मात्र या वक्तव्यामुळे कंगना आता अडचणीत सापडली आहे. आता च्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य प्रीती शर्मा मेनन यांनी अभिनेत्रीविरोधात मुंबईत तक्रार दाखल केली आहे. कंगनाने केलेल्या अपमानास्पद वक्तव्याचा पक्षाने निषेध केला असून तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवण्याचे आवाहन केले. प्रीती मेनन यांनी ट्वीट करत त्यांनी मुंबई पोलिसांकडे अर्ज सादर केला असून, कंगनाविरोधात कलम ५०४, ५०५ आणि १२४ अ अंतर्गत देशद्रोह आणि प्रक्षोभक विधान केल्याबद्दल कारवाई करण्याची विनंती केली. दरम्यान, वरुण गांधी यांनी कंगनाच्या वक्तव्याचा निषेध केला होता. त्यांनी ट्वीट करत म्हटले की, 'हा एक देशविरोधी कृत्य आहे. असे न म्हणणे म्हणजे ज्यांनी स्वातंत्र्यासाठी आपले रक्त सांडले त्यांच्यासोबत विश्वासघात केल्यासारखं होईल. स्वातंत्र्य चळवळीतील असंख्य बलिदान लोक कधीही विसरू शकत नाहीत ज्यात लाखो लोकांचे प्राण गेले आणि अनेक कुटुंबं उद्ध्वस्त झाली. या हुतात्म्यांचा हा लाजिरवाणा अपमान म्हणजे निव्वळ मूर्खपणाचे विधान म्हणता येणार नाही.' 'कधी महात्मा गांधींच्या बलिदानाचा आणि तपश्चर्येचा अपमान, कधी त्यांच्या मारेकऱ्याचा आदर, आता तर शहीद मंगल पांडेपासून राणी लक्ष्मीबाई, भगत सिंग, चंद्रशेखर आझाद, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यापर्यंत लाखो स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाचा अवमान. या विचारसरणीला मी वेडेपणा म्हणावे की देशद्रोह?' कंगनाचा वरुण यांच्यावर पलटवार- म्हणाली, जा आणि रडत बस वरुण गांधींच्या ट्वीटवर कंगनाने प्रत्युत्तर दिले. ट्विटर अकाउंट बॅन झाल्यामुळे कंगनाने वरुणला इन्स्टाग्रामवर उत्तर दिले. आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर ट्वीटचा स्क्रीनशॉट शेअर करत तिने लिहिले की, 'मी स्पष्टपणे सांगितले आहे की १८५७ चा लढा हा पहिला स्वातंत्र्य लढा होता, जो दडपला गेला आणि परिणामी ब्रिटीशांचे अत्याचार आणि क्रूरता आणखीनच वाढली. त्यानंतर सुमारे एक शतकानंतर आपल्याला गांधीजींच्या भिकेच्या भांड्यात स्वातंत्र्य मिळाले.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3qstBWR