मुंबई: ज्येष्ठ इतिहास संशोधक, शिवप्रेमी, पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची वयाच्या ९९ वर्षी प्राणज्योत मालवली. त्यांच्या जाण्यानं प्रत्येक क्षेत्रातूनच हळहळ व्यक्त होत आहे. मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनीदेखील त्यांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्याविषयीच्या आठवणींना उजळा दिला. अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून बाबासाहेब पुरंदरे यांच्यासोबतच्या खास आठवणी सांगितल्या. असं असताना प्रसिद्ध अभिनेते यांनी मात्र बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सोशल मीडियावर पोस्ट शेअर न केल्यानं अनेकांनी त्यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. प्रशांत दामले सोशल मीडियावर सक्रिय असतात. इतकंच नव्हे तर चाहत्यांच्या प्रतिक्रिया ते स्वत: वाचतात आणि त्यांना उत्तरं ही देतात. असं असताना ट्रोल करणाऱ्या युझरला दामलेंनी उत्तर दिलं नसतं तर नवल. त्यांनी या युझरला काही मोजक्याच शब्दात उत्तर देत बोलती बंद केली आहे. प्रशांत दामले यांनी या युझरला दिलेलं उत्तर वाचून त्यांच्या चाहत्यांनी त्यांचं कौतुक करत त्यांना पाठिंबा दिला आहे. नाटकांचे दौरे आणि प्रयोग याबद्दल प्रशांत दामले त्यांच्या सोशल मीडियावर माहिती शेअर करत असतात. बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन झाले त्या दिवशीही त्यांनी एक पोस्ट शेअर केली. 'एका लग्नाची पुढची गोष्ट.आज रात्र कोल्हापूर उद्या कऱ्हाड परवा सांगली.निघालोय मुंबईहून.' अशी एक पोस्ट दामलेंनी शेअर केली होती. त्यांच्या या पोस्टवर आनंद राज या नावाच्या युझरनं केलेली कमेंट सर्वाचं लक्ष वेधून घेत होती. प्रशांत दामले बाबासाहेब पुरंदरेंचं निधन झालं आहे, तुम्हाला श्रद्धांजली देण्यासाठी वेळ नाही का? असा प्रश्न एका युझरनं विचारला. यावर दामले काय उत्तर देतात याकडं सर्वांच लक्ष लागलं होतं. परंतु प्रशांत दामले यांनी अगदी मोजक्या शब्दांत या युझरला उत्तर दिलं. आनंद राज सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली तरच एखाद्या व्यक्तीबद्दल आदर असतो असं काही नाही. बाबासाहेब आम्हा कलाकारांच्या हृदयात आहेत आणि राहतील. त्याचा गाजावाजा का करायचा? असं प्रशांत दामले यांनी त्यांच्या उत्तरात म्हटलं आहे. .
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3HncYBM