Full Width(True/False)

विक्रम गोखले विचार करुनच बोलले असतील... अवधूत गुप्तेचाही पाठिंबा

मुंबई : बॉलिवूडची अभिनेत्री कंगना रणौतने भारताच्या स्वातंत्र्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यामुळे तिच्यावर चहूबाजूंनी टीका होत आहे. मात्र असे असताना कंगनाच्या या वादग्रस्त विधानाला ज्येष्ठ अभिनेते यांनी जाहीर पाठिंबा देत तिचे समर्थनही केल्याने अनेकांना मोठा आश्चर्याचा धक्का बसला आहे. विक्रम गोखले यांच्या या भूमिकेमुळे अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मात्र, संगीतकार-गायक अवधुत गुप्तेने मात्र विक्रम गोखले हे आम्हाला वडिलांच्या स्थानी असून ते मोठे विचारवंत आहेत. त्यामुळे ते जे काही या संदर्भात बोलले असतील त्या मागे त्यांचे काही ठोस विचार असतील असे सांगत त्यांचे समर्थन केले आहे. काय म्हणाले अवधूत गुप्ते विक्रम गोखले यांनी कंगना रणौतच्या वादग्रस्त वक्त्व्याला पाठिंबा दिल्याबद्दल अवधूत गुप्ते यांना त्यांची प्रतिक्रिया विचारली. त्यावेळी अवधूत यांनी सांगितले की, 'विक्रम गोखले मोठे कलाकार आहेत. तसेच ते विचारवंत देखील आहेत. त्यांचा विविध विषयांवर मोठा अभ्यास आहे. ते आमच्या वडिलांच्या स्थानी असल्याने त्यांच्याबद्दल खूप आदर आहे. त्यामुळेच विक्रमजी जे काही बोलले असतील ते विचार करूनच बोलले असतील. त्यांनी व्यक्त केलेले मत पूर्ण विचारांती असावे. त्यावर प्रतिक्रिया देण्याइतकी माझी पात्रता नाही.' असे अवधूत गुप्ते यांनी म्हटले आहे. 'कंगनाने भारताला स्वातंत्र्य मिळाले ती भीक होती, २०१४ ला खरे स्वातंत्र मिळाले याबद्दल तुमची काय भूमिका आहे असा प्रश्न यावेळी विचारण्यात आला. त्यावेळी यांनी कोणतेही मत व्यक्त केले नाही. काय म्हणाले होते विक्रम गोखले? पुण्यातील ब्राह्मण महासंघाच्यावतीने सन्मान सोहळा आयोजित केला होता. यावेळी अभिनेते विक्रम गोखले यांनी देशाचे राजकरण तसेच सध्याच महाराष्ट्रातील राजकारण यावर भाष्य केले. त्याचप्रमाणे त्यांनी यावेळी बॉलिवू़ड अभिनेत्री कंगना रणौतने देशाच्या स्वातंत्र्यवरून केलेल्या विधानाला देखील पाठींबा दर्शवला. विक्रम गोखले यांनी कंगनाच्या वक्तव्याला पाठिंबा दिल्याने ते वादात सापडले आहेत. अभिनेत्री स्वरा भास्करने ट्विट करत त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. तर अभिनेता अतुल कुलकर्णीने एका ओळीचे ट्विट केले आहे ज्याचा संबंध थेट विक्रम गोखलेंशी जोडला जातो आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3FrtM8O