मुंबई- बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाचा सीजन सुरू आहे. नुकताच अभिनेता राजकुमार राव त्याची गर्लफ्रेण्ड पत्रलेखासोबत वैवाहबंधनात अडकला तर विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्या लग्नाच्या देखील सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहेत. आज आदित्य सील आणि अनुष्का रंजन यांचाही विवाह मोठ्या धुमधडाक्यात पार पडतो आहे. त्यांच्या संगीत सोहळ्याला देखील अनेक बॉलिवूड अभिनेत्रींनी हजेरी लावली होती. त्यात सगळ्यात पुढे होती अभिनेत्री . परंतु, संगीत सोहळ्यासाठी आलियाने परिधान केलेले कपडे पाहून नेटकरीदेखील चकित झाले. अनुष्का आणि आदित्य यांच्या लग्नाला आलिया सोबतच, वाणी कपूर, रवीना टंडन, भूमी पेडणेकर, क्रिस्टल डीसुजा यांनी हजेरी लावली होती. सगळ्याच अभिनेत्री भरजरी लेहेंगा चोलीमध्ये दिसल्या. आलियाने देखील पिवळ्या रंगाची लेहेंगा चोली परिधान केली होती. मात्र आलियाच्या चोलीकडे नेटकऱ्यांच्या नजरा खिळून राहिल्या. आलियाने हटके फॅशनची चोली घातली होती. आलियाची ही चोली नेटकऱ्यांना फारशी पसंत पडली नाही. आलियाच्या कपड्यांवरून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. एका युझरने लिहिलं, 'पारंपरिक कपड्यांना श्रद्धांजली.' दुसऱ्या युझरने लिहिलं, 'सगळ्यात घाणेरडा फॅशन सेन्स दाखवतेय आलिया' आणखी एका युझरने लिहिलं, 'फॅशन डिझास्टरचा पुरस्कार जातोय आलिया भट्टला' काही युझर्सनी तर आलियाची तुलना उर्फी जावेदसोबत केली. आणखी एका युझरने लिहिलं, 'आलिया हे काय घातलंय? फॅशनच्या नावाखाली काहीही घालायचं?' तर दुसरीकडे काही युझर्सनी आलियाच्या कपड्यांचं कौतुक देखील केलं.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3FxM3BF