मुंबई: दिवंगत बॉलिवूड अभिनेता याच्या मृत्यूनंतर अभिनेत्री हिच्यावर अनेक गंभीर आरोप केले गेले. महिनाभर तिला तुरुंगात जावं लागलं होतं. अंमली पदार्थांचं सेवन केल्यामुळं ती एनसीबीच्या नजरेत आली होती. नार्कोटिक्स ब्युरोकडून तिच्यावर कारवाई करण्यात आली. या प्रकरणात तिला जामीन मिळाला पण, त्यानंतर तिच्या आयुष्यात आणि चित्रपटसृष्टीत अनेक गोष्टी बदलल्या होत्या. रिया बॉलिवूड इंडस्ट्रीपासून दूर झाली होती. कित्येक महिने ती सोशल मीडियावर सक्रिय नव्हती. आता मात्र ती तिच्या आयुष्यात पुढं जाताना दिसतेय. सुशांत सिंहप्रकरणानंतर रिया पहिल्यांदाच पार्टीत सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं. रियानं नुकतीच एका बॉलिवूड पार्टीला हजेरी लावली होती. रिया पार्टीत येताच चर्चेला उधाण आलं. तिच्या लुकचीही चाहत्यांमध्ये चर्चा सुरू आहे. रियानं या पार्टीत गोल्डन रंगाचा लेहंगा परिधान केला होता. या पार्टीतील रियाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3oQ39UE