भारतीय बाजारात गेल्या काही महिन्यात नियमित घड्याळांप्रमाणेच स्मार्टवॉचची मागणी देखील वाढल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या स्मार्टवॉच या केवळ वेळ दाखविण्याचे काम न करता अनेक शानदार फीचर्ससह येतात. या स्मार्टवॉमध्ये कॉलिंग, नॉटिफिकेशन, हेल्थसह अनेक दमदार फीचर्स मिळतात. त्यामुळे नियमित वॉचच्या तुलनेत ग्राहक स्मार्टवॉचला प्राधान्य देताना दिसत आहेत. विशेष म्हणजे या स्मार्टवॉचची किंमत देखील कमी असते. स्मार्टवॉचचा आता केवळ स्टाइल म्हणून नाही तर हेल्थच्या दृष्टीने देखील वापर केला जात आहे. तुम्ही देखील स्वतःसाठी नवीन स्मार्टवॉच खरेदी करण्याचा विचार करत असाल तर बाजारात अनेक चांगले पर्याय उपलब्ध आहेत. तुम्ही FitBit Sense, Samsung Galaxy Watch 4, Apple Watch 7, Garmin Fenix 6 Pro Solar आणि Apple Watch SE या शानदार फीचर्ससह येणाऱ्या स्मार्टवॉचला खरेदी करू शकता.

FitBit Sense
FitBit Sense ही शानदार फीचर्ससह येणारी स्मार्टवॉच आहे. यात ईसीजी अॅप, स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी वापरले जाणारे एक ईडीए सेंसर आणि एक नवीन स्किन टेंप्रेचर सेंसर फीचर दिले आहे. या फीचरमुळे ताप आला असल्यास त्याबाबत माहिती मिळते. यामध्ये कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथचा सपोर्ट दिला आहे. तसेच, स्लिप मॉनिटर सपोर्ट देखील मिळतो. शानदार हेल्थ आणि फिटनेस फीचर्ससह येणाऱ्या FitBit Sense या स्मार्टवॉचला तुम्ही २२,९९९ रुपयात खरेदी करू शकता.
Apple Watch SE
Apple Watch SE सर्वाधिक विक्री होणाऱ्या स्मार्टवॉच पैकी एक आहे. कमी किंमतीत येणाऱ्या या वॉचमध्ये शानदार फीचर्स मिळतात. स्मार्टवॉच स्पोर्ट लूप बँड आणि अॅल्यूमिनियम केसिंग व्हर्जन सिल्वर, गोल्ड आणि स्पेस ग्रे रंगात येते. याच्या ४० एमएम व्हेरिएंटची किंमत २९,९०० रुपये, ४२ एमएम व्हेरिएंटची किंमत ३२,९०० रुपये आहे. सिंगल चार्जमध्ये याची बॅटरी १८ तास टिकते. यामध्ये ओलेड रेटिना डिस्प्ले दिला आहे.
Samsung Galaxy Watch 4
Samsung Galaxy Watch 4 च्या ४० एमएम डायल व्हेरिएंटची किंमत २३,९९९ रुपये, ४४ एमएम एलटीई मॉडेलची किंमत २६,९९९ आहे. तर नियमित ४० एमएम मॉडेलची किंमत २८,९९९ रुपे व ४४ एमएम व्हेरिएंटची किंमत ३१,९९९ रुपये आहे. स्मार्टवॉच Exynos W९२० SoC सपोर्टसह येते. यात ३९६x३९६ पिक्सल रिझॉल्यूशनसह येणारा १.२ इंच एमोलेड डिस्प्ले दिला आहे. ४६ एमएम व्हेरिएंटमध्ये १.४ इंच (४५०x४५० पिक्सल) एमोलेड डिस्प्ले मिळतो. तसेच, १.५ जीबी पेक्षा अधिक रॅम दिली आहे.
Apple Watch Series 7
Apple Watch 7 च्या अॅल्यूमिनियम केससह जीपीएस मॉडेलच्या ४१ एमएम व्हेरिएंटची किंमत ४१,९०० रुपयांपासून सुरू होते. तर ४१ एमएम जीपीएस +सेल्यूलर व्हेरिएंटची किंमत ५०,९०० रुपये आहे. ४५ एमएम जीपीएस मॉडेलची किंमत ४४,९०० रुपये आणि ४५ एमएम जीपीएस +सेल्यूलर व्हेरिएंटची किंमत ५३,९०० रुपये आहे. स्मार्टवॉच ऑलवेज-ऑन रेटिना डिस्प्ले, आयपीएक्सएक्स-रेटेड बिल्डसह येते. Apple Watch 7 स्मार्टवॉच WatchOS ८ आउट-ऑफ-द-बॉक्सवर काम करते.
Garmin Fenix 6 Pro Solar
Garmin Fenix 6 Pro Solar या स्मार्टवॉचमध्ये देखील एकापेक्षा एक शानदार फीचर्स मिळतात. ही स्मार्टवॉच सोलर चार्जिंग सपोर्ट आणि पॉवर मॅनेजर मोडसह येते. पॉवर मॅनेजर मोडद्वारे बॅटरी परफॉर्मेंसला मॅनेज करण्यास मदत होते. गार्मिन फेनिक्स, ब्लॅक आणि स्लेट ग्रे बँडसह स्मार्टवॉचची किंमत ८८,४९० रुपये आणि व्हाइटस्टोन बँडसह कोबाल्ट ब्लू रंगाच्या व्हेरिएंटची किंमत ९८,९९० रुपये आहे. या वॉचमध्ये देखील शानदार हेल्थ फीचर्स दिले आहेत.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/31UKFKS