Full Width(True/False)

माझे आई-बाबा कधीही...; बालपण आठवून रडू लागला करण कुंद्रा

मुंबई- छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता सध्या '' च्या घरात आहे. बिग बॉसच्या घरातील या आठवड्यातील वीकेण्ड चा वार खूप जास्त रंजक होता. एकीकडे सलमान खानने जय भानुशाली, उमर रियाझ आणि प्रतीक सहजपाल यांची शाळा घेतली तर दुसरीकडे करण कुंद्रा बालपणीच्या आठवणींमुळे रडताना दिसला. तेजस्वी प्रकाश जेव्हा करणला त्याच्या वागण्याचा जाब विचारते तेव्हा करण त्याच्यासोबत घडलेल्या घटनांचा दाखला देत इतर कुणाला त्या परिस्थतीत पाहू शकत नसल्याचं म्हणतो. तेजस्वी करणला विचारते की, त्याने सगळ्यांचं व्यक्तिमत्व सुधारण्याचा ठेका घेतला आहे का? तो शमिताकडे का गेला? तो शमिताला समजवण्याचा प्रयत्न का करतोय? त्यावर करण तेजस्वीला म्हणतो की, तो राजीव अदातिया सोबत जे झालं त्यावर शमिताला समजवायला गेला होता. करण म्हणतो की, त्याच्यासोबत जे लहानपणी झालं त्यामुळे त्याला राजीवसोबत एक भावनिक नातं जाणवतं आणि त्यामुळे त्याला वाटतं की इतर कुणीही त्या परिस्थितींमधून जावू नये. करण म्हणतो, 'जेव्हा तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तींसोबत मनातलं बोलू शकत नाही, मनमोकळ्या गप्पा मारू शकत नाही तेव्हा काय वाटतं हे मला माहितीये. मी अनेकदा अशी परिस्थिती पाहिलीये जेव्हा मला वाटायचं की मला माझ्या आई- वडिलांची साथ हवीये. मला त्यांच्यासोबत बोलायचं आहे. पण ते कधीच माझ्यासोबत व्यवस्थित बोलले नाहीत.' पुढे करण म्हणाला, 'मला नेहमी वाटायचं की माझ्या आई- वडिलांनी माझ्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवावा, माझ्यावर प्रेम करावं पण तसं काहीही झालं नाही. ते नेहमी मला ओरडत आले. जेव्हा आई- वडील आपल्या मुलाला समजून नाही घेऊ शकत तेव्हा मुलं अनेकदा वाईट रस्ता निवडतात.' हे बोलत असताना करण रडू लागला आणि म्हणाला, 'माझ्याकडे तेव्हा बोलायला कुणी असतं तर कदाचित आज मी असा या परिस्थितीत नसतो.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/325h41v