Full Width(True/False)

३० नोव्हेंबर रोजी भारतात येतोय शाओमीचा हा स्मार्टफोन, पाहा संभावित किंमत-स्पेसिफिकेशन

नवी दिल्लीः Xiaomi चा नवीन स्मार्टफोन पुढील आठवड्यात ३० नोव्हेंबर रोजी भारतात लाँच होणार आहे. कंपनीकडून एक टीझर जारी करण्यात आले आहे. ज्यात आगामी फोनची बॅटरी संबंधित माहिती मिळाली आहे. याशिवाय, अनेक रिपोर्ट्स सुद्धा लीक झाली आहेत. यात अनेक फीचर्सची माहिती मिळाली आहे. जाणून घ्या डिटेल्स. शाओमीकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, अपकमिंग 5G स्मार्टफोन 33W प्रो फास्ट चार्जिंग सोबत येईल. याशिवाय, जास्त काही माहिती समोर आली नाही. लीक रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, रेडमी नोट ११ टी स्मार्टफोन मध्ये ६.६ इंचाचा एफएचडी प्लस एलसीडी डिस्प्ले मिळू शकतो. या स्मार्टफोनमध्ये ५० मेगापिक्सलचा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला जावू शकतो. हा Android 11 बेस्ड MIUI 12.5 ऑपरेटिंग सिस्टम वर काम करतो. Redmi Note 11T 5G ची संभावित किंमत मीडिया रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, रेडमी नोट ११ ५जी स्मार्टफोनमध्ये 6GB+64GB, 6GB+128GB आणि 8GB+128GB स्टोरेज ऑप्शन मध्ये आणले जावू शकते. याची सुरुवातीची किंमत १६ हजार ९९९ रुपये असेल. सोबत याला अनेक कलर पर्याय मध्ये उतरवले जावू शकते. Redmi Note 11 शाओमीने यावर्षी ऑक्टोबर मध्ये रेडमी नोट ११ स्मार्टफोला ग्लोबली लाँच केले होते. या फोनची सुरुवातीची किंमत ११९९ चिनी युआन म्हणजेच जवळपास १४ हजार रुपये आहे. रेडमीच्या या फोनमध्ये ६.५ इंचाचा एलसीडी डिस्प्ले दिला आहे. याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. यात MediaTek Dimensity 810 प्रोसेसर आणि 50MP चा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. याशिवाय, ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट सोबत 5,000mAh ची बॅटरी दिली आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/30Mp5rk