नवी दिल्ली: wi-fi नेटवर्कचा पासवर्ड विसरणे सामान्य आहे. परंतु जेव्हा आपण आपले घरातील Wi-Fi नेटवर्क आपल्या मित्रांसह आणि कुटुंबातील इतर सदस्यांसह शेयर करतो तेव्हा ही समस्या अधिकच बिकट होते. या परिस्थितीत वाय-फाय नेटवर्क रीसेट करावे लागते , तर दुसरीकडे इंटरनेटवर पासवर्ड रिकव्हर करण्याचे मार्ग शोधावे लागतात. यामुळे फक्त वेळ वाया जातो. आज आम्ही तुम्हाला अशा काही ट्रिक्स सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही वाय-फाय पासवर्ड रिसेट न करता शोधू शकता. वाचा: Windows PC आणि Laptop यूजर्ससाठी :
- स्टार्ट मेनू उघडा आणि नेटवर्क स्टेटस शोधा.
- याशिवाय, वाय-फाय आयकॉनवर राइट-क्लिक करा आणि नेटवर्क आणि इंटरनेट सेटिंग्जवर जा आता Change Adapter पर्यायावर क्लिक करा.
- तुमच्या स्क्रीनवर एक नवीन विंडो उघडेल, ज्यामध्ये तुम्हाला वाय-फाय कनेक्शन दिसेल येथे Wi-Fi वर डबल क्लिक करा आणि वायरलेस प्रॉपर्टीवर क्लिक करा.
- तुम्हाला कनेक्शन आणि सिक्युरिटी पर्याय दिसतील, त्यावरून सिक्युरिटीवर क्लिक करावे लागेल.
- आता कॅरेक्टर्स बॉक्समध्ये दिलेल्या Show वर क्लिक करा. यानंतर तुम्हाला तुमचा Wi-Fi पासवर्ड लिहिलेला दिसेल.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3DJEaZl