नवी दिल्लीः boAt ने भारतात आपली नवीन स्मार्टवॉच- ला लाँच केले आहे. कंपनीने या स्मार्टवॉचची किंमत १ हजार ९९९ रुपये ठेवली आहे. वॉचला तुम्ही अमेझॉन इंडियावरून खरेदी करू शकता. या स्मार्टवॉचचा सेल ११ नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे. स्मार्टवॉचला ब्लू, ग्रे आणि ब्लॅक कलर ऑप्शन मध्ये लाँच करण्यात आले आहे. कंपनीने आपल्या नवीन स्मार्टवॉचमध्ये काय काय दिले आहे, जाणून घ्या डिटेल्स. बोट वॉच जेनिटचे फीचर आणि स्पेसिफिकेशन सर्कुलर डायलच्या कंपनीच्या या नवीन स्मार्टवॉच मध्ये १.३ इंचाचा आयपीएस डिस्प्ले दिला आहे. वॉच मध्ये उजव्या बाजुला दोन बटन दिले आहेत. हे बटन नेव्हिगेशन शिवाय, अनेक फंक्शनसाठी काम करतात. वॉचचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात १०० हून जास्त वॉच फेस दिले आहेत. याला कस्टमाइज सुद्धा केले जावू शकते. IP67 रेटिंगच्या या वॉच मध्ये हेल्थ आणि फिटनेस शिवाय, अनेक आवश्यक फीचर दिले आहेत. वॉच मध्ये तुम्हाला बिल्ट इन हार्ट रेट मॉनिटर सोबत SpO2 सेंसर मिळेल. याशिवाय, बोटची ही वॉच यूजरच्या स्टेप्सला मॉनिटर करते. वॉचमध्ये कंपनी डिस्टेंस कवर्ड आणि स्लीप पॅटर्न मॉनिटरचे फीचर ऑफर करते. बिल्ट इन कॅलरी काउंटरच्या या वॉच मध्ये फुटबॉल आणि क्रिकेट सोबत सात स्पोर्ट्स मोड सुद्धा दिले आहेत. या स्मार्टवॉचच्या मदतीने तुम्ही म्यूझिक आणि कॅमेराला सुद्धा कंट्रोल करू शकता. याशिवाय, वॉचमध्ये तुम्हाला सोशल मीडिया नोटिफिकेशन सोबत मेसेज आणि इनकमिंग कॉल्सची माहिती मिळते. कंपनीने या वॉच मध्ये ६ दिवसाचा वेदर फोरकास्ट फीचर सुद्धा दिले आहे. बॅटरी वरून कंपनीचा दावा आहे की, ही वॉच एकदा फुल चार्ज झाल्यानंतर ७ दिवसांपर्यंत बॅटरी बॅकअप देते. यूजर्संना इंटरटेनमेंटसाठी या वॉचमध्ये यंग बर्ड गेम सुद्धा दिले आहे. जबरदस्त व्यूइंग एक्सपीरियन्ससाठी वॉच मध्ये थिएटर मोड सपोर्ट सुद्धा दिले आहे. वाचा: वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3n1MYUt