Full Width(True/False)

BSNL Plans :BSNL च्या 'या' अफोर्डेबल प्लानमध्ये मोठा बदल, मिळणार अधिक व्हॅलिडिटी, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली : भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ने आपल्या १८७ रुपयांच्या प्रीपेड प्लानमध्ये बदल केले आहेत. या प्लानमध्ये आता ग्राहकांना २४ दिवसांऐवजी २८ दिवसांची वैधता मिळणार आहे. यासोबतच कंपनीने या प्लानमधील डेटा लिमिटमध्येही बदल केला आहे. हा प्लान कंपनीच्या इतर अनलिमिटेड कॉलिंग प्रीपेड प्लॅनसह उपलब्ध असेल - रु १४७, रु २४७ आणि रु ४४७. गेल्या महिन्यात, ने देखील त्यांच्या ५६ रुपये, ५७ रुपये आणि ५८ रुपयांच्या प्लानमध्ये बदल केले आहेत. वाचा: BSNL केरळने आपल्या प्रीपेड प्लानमधील बदलाबाबत ट्विटरवर माहिती दिली आहे. कंपनीच्या १८७ रुपयांच्या प्लानमध्येही बदल करण्यात आले आहेत. १८७ रुपयांच्या बदललेल्या प्लानमध्ये आता ग्राहकांना २ GB डेटा, २८ दिवसांची वैधता आणि अनलिमिटेड कॉलचा लाभ मिळणार आहे. मुंबई-दिल्ली मधील MTNL नेटवर्कवरही अनलिमिटेड कॉल्सचा लाभ ग्राहकांना मिळणार आहे. प्लानची २ GB दैनंदिन डेटा मर्यादा संपल्‍यानंतरही ग्राहक इंटरनेट वापरू शकणार आहेत. पण, स्पीड ८० Kbps पर्यंत कमी होईल. बीएसएनएलच्या १८७ रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना दररोज १०० मेसेजेस देखील दिले जातील. हा प्लान मोफत PRBT रिंगटोनसह देखील येते. गेल्या महिन्यात, BSNL ने आपल्या ५६ रुपये, ५७ रुपये आणि ५८ रुपयांच्या प्लानमध्ये बदल केले आहेत. बदल केल्यानंतर, BSNL ने आता ५६ रुपयांचा प्लान ५४ रुपयांचा, ५७ रुपयांचा ५६ रुपयांचा आणि ५८ रुपयांचा प्लान ५७ रुपयांचा उपलब्ध करून दिला आहे. मात्र, त्यांच्यासोबत मिळणाऱ्या फायद्यांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3oWJTVF