नवी दिल्लीः भारतात Cryptocurrency ट्रेडिंग खूपच वेगाने वाढत आहेत. मीडिया रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, सरकार यावर कधीही महत्त्वपूर्ण निर्णयाची घोषणा करू शकते. लोक बिटकॉइन आणि दुसऱ्या करन्सीवर पैसा लावत आहेत. त्यात गुंतवणूक करीत आहेत. व्हर्च्युअली करन्सीमध्ये जर तुम्हाला सुद्धा गुंतवणूक करायची असेल तर यासाठी अनेक अॅप्स उपलब्ध आहेत, जाणून घ्या डिटेल्स. या अॅप्सवरून तुम्ही सहज क्रिप्टोकरन्सी खरेदी किंवा विक्री करू शकतात. या ठिकाणी तुम्हाला क्रिप्टोकरन्सी ट्रेडिंग करण्यासाठी काही पॉप्यूलर अॅप्सची माहिती दिली आहे. CoinDCX सध्या CoinDCX खूपच वेगाने वाढत आहे. याच्या यूजर फ्रेंडली इंटरफेस मुळे तुम्हाला क्रिप्टो ट्रेंडिंग मध्ये जास्त अडचण येणार नाही. यात तुम्ही केवायसी केल्यानंतर जास्त पैसे गुंतवणूक करू शकता. तुम्ही याच्या वेब व्हर्जनला सुद्धा आपल्या लॅपटॉपवर यूज करू शकता. WazirX WazirX सुद्धा खूपच सक्सेसफूल क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज आहे. हे अॅप अँड्रॉयड आणि आयओएस दोन्हीवर चांगले काम करू शकते. यासाठी तुम्हाला याच्या विंडोज किंवा मॅक अॅप चा सुद्धा वापर करता येवू शकतो. CoinSwitch kuber CoinSwitch kuber एक स्टेबल आणि यूजर फ्रेंडली इंडियन प्लॅटफॉर्म आहे. याने तुम्ही क्रिप्टो ट्रेंडिंग सहज करू शकता. यासाठी तुम्हाला केवायसी प्रोसेस पूर्ण करावी लागते. हे अॅप सुरुवातीसाठी खूपच उपयोगी आहेत. Unocoin Unocoin खूपच जबरदस्त क्रिप्टो एक्सचेंज अॅप आहे. याचा यूजर इंटरफेस खूपच सिंपल आहे. हे अनेक क्रिप्टोकरन्सीला सपोर्ट करतो. यावर अकाउंट बनवण्यासाठी तुम्हाला केवायसी पूर्ण करावी लागते. यात तुम्ही सेलला शेड्यूल्ड ऑटो वर सुद्धा ठेवू शकतात. पाहा: पाहा: पाहा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3cbD5x4