Full Width(True/False)

Earn Money Online: स्मार्टफोनवरुन करू शकता हजारो रुपयांची कमाई, ‘हे’ अ‍ॅप्स येतील उपयोगी

नवी दिल्ली : कमाईसाठी आपण सर्वचजण वेगवेगळे माध्यम शोधत असतो. मात्र, तुम्ही केवळ स्मार्टफोनच्या माध्यमातून मोठी कमाई करू शकता. गुगल प्ले स्टोरवर असे अनेक अ‍ॅप उपलब्ध आहेत, ज्यावर तुम्ही काही तास घालवून सहज पैसे कमवू शकता. प्ले स्टोरवर काही फेक देखील उपलब्ध आहेत, त्यामुळे अशा अ‍ॅप्सचा वापर टाळावा. वाचा: गुगल प्ले स्टोरवर उपलब्ध अशाच काही अ‍ॅप्सबाबत जाणून घेऊया, ज्याच्या माध्यातून तुम्ही कमाई करू शकता. गेम टेस्टर जर तुम्हाला गेम खेळण्याची आवड असल्यास तुम्ही या अ‍ॅपद्वारे गेम खेळून पैसे कमवू शकता. यासाठी तुम्हाला हे अ‍ॅप फोनमध्ये डाउनलोड करायचे आहे व त्यानंतर गेम टेस्ट करून यातील त्रुटी व चांगल्या गोष्टी सांगायच्या आहेत. यातून तुम्हाला पैसे मिळतील. यात एक गेम टेस्ट करण्यासाठी ५० ते १५० रुपये मिळतात. तुम्ही एका तासात ५ गेम टेस्ट केल्यास १ हजार रुपयांपर्यंत पैसे मिळतील. अनेक कंपन्या ऑनलाइन सर्व्हेसाठी पैसे देत असतात. यासाठी तुम्हाला ऑनलाइन सर्वे करणारे अ‍ॅप्स प्ले स्टोरवरून डाउनलोड करावे लागतील. या अ‍ॅपवर तुम्ही सर्व्हे केल्यानंतर १०० रुपयांपर्यंत कमाई होईल. असे अनेक अ‍ॅप्स आहेत, ज्याद्वारे तुम्हाला वेवेगळे प्रोडक्ट्स दिले जातात. या प्रोडक्ट्सचा रिव्ह्यू केल्यावर तुम्हाला पैसे दिले जातात. हे पैसे जास्त नसले तरीही अतिरिक्त कमाईसाठी तुम्ही हे करू शकता. ऑनलाइन गेम-प्ले अनेक असे अ‍ॅप्स आहेत, ज्यावर ऑनलाइन गेम खेळून तुम्ही कमाई करू शकता. तुम्हाला गेम जिंकल्यावर कॉइन्स मिळतील व याला तुम्ही रिडीम करू शकता. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3cmh2DZ