नवी दिल्ली : टेलिकॉम कंपनी ग्राहकांना अनेक रिचार्ज प्लान्स ऑफर करत असते. या प्लान्समध्ये डेटासोबत कॉलचे फायदेही दिले जातात. काही काळापूर्वी रिलायन्स जिओने नवीन ऑफर सुरू केली होती. यासह, काही प्रीपेड प्लॅनवर युजर्सना कॅशबॅक दिला जात आहे. रिलायन्स जिओची ही कॅशबॅक ऑफर सर्व प्रीपेड प्लान्ससाठी नाही. Reliance jio कॅशबॅक ऑफर २४९ रुपये, ५५५ रुपये आणि ५९९ रुपयांवर उपलब्ध आहे. वाचा: या कॅशबॅक ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कंपनीच्या वेबसाइटवरून किंवा MyJio अॅपवरूनच रिचार्ज करावे लागेल. कंपनीने या ऑफरला Cashback असे नाव दिले आहे. या ऑफरमध्ये रिचार्ज केल्यावर यूजर्सला २० % कॅशबॅक मिळतो. जिओ मार्ट, रिलायन्स डिजिटल, जिओ रिचार्ज आणि इतर सेवांमध्ये कॅशबॅक मिळू शकतो. या ऑफरमध्ये २४९ रुपयांच्या रिचार्जवर यूजर्सला जवळपास ५० रुपयांचा कॅशबॅक दिला जात आहे. त्याचप्रमाणे ५५५ रुपयांच्या रिचार्जवर १११ रुपयांचा कॅशबॅक दिला जात आहे. म्हणजेच तुम्ही ५५५ रुपयांचा प्लान फक्त ४४४ रुपयांमध्ये घेऊ शकता. कंपनी ५९९ रुपयांच्या प्रीपेड प्लानवर कॅशबॅक देखील देत आहे. यावर यूजर्सला १२० रुपयांचा कॅशबॅक दिला जात आहे. हे सर्व प्रीपेड प्लान्स डेटा आणि कॉल फायद्यांसह येतात. या प्लान्ससह, युजर्सना Jio च्या JioTV, JioCinema, JioSecurity, JioNews आणि JioCloud सारख्या अॅप्सचे सदस्यत्व देखील दिले जाते. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3Cs2ai0