Full Width(True/False)

अकाउंट करा डबल सिक्योर ! Google च्या ​​​​Two Step Verification मुळे हॅकर्स राहतील दूर, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली: गेल्या महिन्यात एका ब्लॉग पोस्टमध्ये, कंपनीने सांगितले की २०२१ च्या अखेरीस 2SV मध्ये अतिरिक्त १५० दशलक्ष Google युजर्सची स्वयं-नोंदणी करण्याची कंपनीची योजना आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, असे केल्यास त्यांचे Gmail अधिक सुरक्षित होईल. ही प्रक्रिया आता योग्यरितीने कॉन्फिगर केलेल्या Account च्या पहिल्या टप्प्यासाठी सुरू आहे. युजर्सना ईमेलद्वारे सूचित केले जात होते की, स्वयंचलितपणे ९ नोव्हेंबरपासून सुरू होईल. पाहा डिटेल्स. वाचा: Two Step Verification महत्वाचे का आहे: सर्व Google खात्यांसाठी Two Step Verification आवश्यक आहे. ही प्रक्रिया योग्यरित्या कॉन्फिगर केलेल्या खात्यांसाठी सुरू करण्यात आली आहे. योग्यरितीने कॉन्फिगर केलेली खाती म्हणजे ज्यांच्याकडे फोन नंबर किंवा दुसरा ईमेल पत्ता असतो. किंवा Google सूचना प्राप्त करण्यासाठी ज्यांनी स्मार्टफोन सेट केला आहे. Google Two-Step Verification का करत आहे: Google च्या मते, तुमच्या स्मार्टफोनवर पासवर्ड आणि टू स्टेप या दोन्हीसह साइन इन केल्याने पासवर्ड चोरीच्या फसवणुकीपासून संरक्षण होते. कोणी तुमचा पासवर्ड ऑनलाइन चोरला तरीही, Two Step Verification पूर्ण करण्यासाठी त्यांच्याकडे तुमचा फोन नसेल. ही प्रक्रिया ९ नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे. फेज I च्या युजर्सना बदलाबद्दल ईमेल मिळण्यास सुरुवात झाली आहे. बदल होण्याच्या सुमारे ७ दिवस आधी युजर्सना ईमेल किंवा सूचना मिळेल. युजर्स स्वतः Two Step Verification चालू करू शकतात. यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमचे Google खाते उघडावे लागेल. त्यानंतर नेव्हिगेशन पॅनेलवर जाऊन आणि सुरक्षा निवडावे लागेल. नंतर Google मध्ये साइन इन करून, Two Step Verification निवडा आणि नंतर पुन्हा प्रारंभ करा. फोन युजर्स शिवाय Two Step Verification कसे सुरू करावे? एखाद्या युजरकडे फोन नसल्यास किंवा त्याचा फोन हरवल्यास, तो Google खात्यामध्ये साइन इन करण्यात मदत करण्यासाठी त्याचा पुनर्प्राप्ती ईमेल वापरू शकतो. Two Step Verification बंद केले जाऊ शकते?Two Step Verification स्वयंचलितपणे बंद आणि चालू केली जाऊ शकते. Google युजर्सना चेतावणी देते की फक्त एका पासवर्डने साइन इन केल्याने तुमचे खाते कमी सुरक्षित होते. YouTube निर्मात्यांसाठी देखील Two-Step Verification आवश्यक : Google ने YouTube निर्मात्यांना YouTube स्टुडिओमध्ये प्रवेश करण्यासाठी Two Step Verification अनिवार्य केले आहे. १ नोव्हेंबर २०२१ पासून याची सुरुवात झाली आहे. कंपनीने आपल्या अधिकृत यूट्यूब अकाउंट टीम यूट्यूबवरून ट्विट करून ही माहिती दिली आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3bXNpZO