नवी दिल्ली : जगभरातील सर्वोत्तम फोन पैकी एक म्हणून iPhones ला ओळखले जाते. आयफोन्सला आपले खास फीचर्स आणि क्वालिटीसाठी लोकप्रिय आहेत. आता आयफोन संदर्भात अशीच एक माहिती समोर आली असून, याद्वारे फोनची गुणवत्ता सिद्ध होते. वाचा: रिपोर्टनुसार, विमान टेकऑफ करताना एका पायलटचा आयफोन रनवेवर पडला. मात्र, त्यानंतर देखील फोन व्यवस्थित काम करत होता. ऑरलँडो एअरपोर्टवर फोन खाली पडल्यानंतर पायलट आणि एअर ट्रॅफिक कंट्रोल एजेंटमध्ये फोन पडल्याबाबत चर्चा देखील होते. हा संवाद सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ५०-६० मैल प्रती तास वेगाने उड्डाण घेतलेल्या विमानातून पडल्यानंतर देखील फोन अगदी व्यवस्थित काम करत होता. पायलटला याबाबत माहिती दिल्यानंतर त्याला देखील यावर विश्वास बसला नाही. विशेष म्हणजे आयफोनच्या स्क्रीनवर कोणता स्क्रॅचही आला नव्हता व फोन नेहमीप्रमाणे वापरता येत होता. दरम्यान, प्रत्येक फ्लॅगशिप स्मार्टफोनला दरवर्षी मजबूत ग्लाससह अपग्रेड करत असतो. XS ला देखील सुरक्षेच्या दृष्टीने शानदार फीचर दिले होते. तर पाण्यात ६ मीटर खोल ३० मिनिटं सुरक्षित राहतो. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3HhDOve