नवी दिल्लीः गुगल कंपनीने मध्ये आपल्या यूजर्ससाठी डार्क मोड फीचरला जारी केले आहे. या फीचरची घोषणा कंपनीने ऑगस्ट महिन्यात केली होती. आता याला सर्व यूजर्ससाठी जारी करण्यात आले आहे. गुगल मॅप्सचे अँड्रॉयड व्हर्जनमध्ये डार्क मोड आधी पासून आहे. आता आयओएस यूजर्ससाठी जारी करण्यात आले आहे. हे यूजर्स आता याचा वापर करू शकतील. गुगल मॅप्स बायडिफॉल्ट लाइट मोड चा वापर करणार आहे. त्यामुळे यूजर्संना डार्क मोड मॅन्यूअल पद्धतीने इनेबल करण्याची गरज पडणार नाही. या फीचर द्वारे यूजर्संना आपल्या स्मार्टफोन मध्ये बॅटरी वाचवण्यास मदत मिळणार आहे. आयओएस मध्ये गुगल मॅप्स मध्ये असे करा डार्क मोड ऑन >> आपल्या आयओएस डिव्हाइस पिक्चरवर क्लिक करा >> आता आपल्या प्रोफाइल पिक्चरवर क्लिक करा >> यानंतर सेटिंग्स ऑप्शन मध्ये जा >> स्क्रोल डाउन करून डार्क मोड वर जा. त्यानंतर यावर क्लिक करा >> या ठिकाणा हून ऑन, ऑफ आणि सेम अॅज डिव्हाइस सेटिंग्स मध्ये सिलेक्ट करू शकाल. ज्यावेळी तुम्ही सेम अॅज डिव्हाइस सेटिंग्स कराल त्यावेळी डिव्हाइस सेटिंगच्या हिशोबानुसार, ऑटोमॅटिकली डार्क मोड ला ऑन केले जाईल . या वर्षी फेब्रुवारी मध्ये गुगल ने गुगल मॅप्ससाठी डार्क मोडला अँड्रॉयड मध्ये उपलब्ध केले होते. आता आयओएस साठी उपलब्ध करण्यात आले आहे. वाचा: वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2YJLkh2