Full Width(True/False)

खूपच लवकर लाँच होणार जिओचा पहिला लॅपटॉप JioBook, मिळतील हे जबरदस्त फीचर्स

नवी दिल्लीः जिओ सध्या आपल्या पहिल्या लॅपटॉपला लाँच करण्याची तयारी करीत आहे. यावर्षी मार्च मध्ये XDA Developers ने खुलासा करण्यात आला आहे की, जिओ एक कमी किंमतीचा नोट बुक डेव्हलप करीत आहे. कंपनीच्या या नोटबुकचे नाव आहे. जिओ बुक संबंधीत लेटेस्ट माहिती दिली आहे. या माहितीनुसार, कंपनी याच्या परफॉर्मन्सची इंटरनल टेस्टिंग करीत आहे. आता हे बेंचमार्किंग वेबसाइट गीकबेंच वर सुद्धा दिसले आहे. यानुसार, अंदाज लावला जात आहे की, हा लॅपटॉप आगामी काही महिन्यात मार्केटमध्ये एन्ट्री करू शकतो. BIS वर झाला आहे लिस्ट काही दिवसांपूर्वी मॉडल नंबर NB1118QMW, NB1148QMW आणि NB1112MM चा जियो बुक ला BIS म्हणजेच ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स वर पाहिले होते. यात मॉडल नंबर NB1112MM चा जिओ बुक आता गीकबेंच वर लिस्ट झाला आहे. याशिवाय, काही स्पेसिफिकेशनची माहिती समोर आली आहे. २ जीबी रॅम आणि मीडियाटेक प्रोसेसर मॉडल नंबर NB1112MM चा जिओ बुक २ जीबी रॅम दिला आहे. प्रोसेसर म्हणून कंपनी यात मीडियाटेक MT6788 चिपसेट ऑफर करणार आहे. जिओबुक अँड्रॉयड ११ ऑपरेटिंग सिस्टम वर काम करतो. गीकबेंचचा सिंगल कोर टेस्ट मध्ये ११७८ आणि मल्टि-कोर टेस्ट मध्ये ४२४६ गुण मिळाले आहे. मिळू शकतो एचडी डिस्प्ले XDA डिवेलपर्सच्या रिपोर्टनुसार, या नोटबुकमध्ये 1366x768 पिक्सल रेजॉलूशनचा एचडी डिस्प्ले दिला आहे. जिओ बुकच्या डिस्प्ले साइज संबंधी कोणतीही कोणतीही माहिती समोर आली नाही. XDA ने आपल्या रिपोर्ट मध्ये म्हटले की, जिओ बुक स्नॅपड्रॅगन ६६५ चिपसेट येणार आहे. यात कंपनी ४ जी कनेक्टिविटीसाठी स्नॅपड्रॅगन X12 मॉडम सुद्धा ऑफर करणार आहे. टॉप व्हेरियंट मध्ये ४ जीबी रॅम जिओ बुकचा बेस मॉडल २ जीबी LPDDDR4x रॅम आणि ३२ जीबीच्या eMMC स्टोरेज सोबत येवू शकतो. तर याच्या टॉप अँड व्हेरिंयट मध्ये ४ जीबी LPDDR4x रॅम आणि ६४ जीबीचे eMMC 5.1 स्टोरेज पाहायला मिळू शकते. कनेक्टिविटीसाठी जिओ बुक मध्ये 4G LTE शिवाय ड्युअल बँड वाय फाय आणि HDMI सारखे ऑप्शन मिळण्याची शक्यता आहे. जिओ बुक मध्ये जिओ स्टोर, जिओ मीट आणि जिओ पेजेस सारखे अॅप्स प्री इंस्टॉल्ड मिळतील. याशिवाय, कंपनी यात मायक्रोसॉफ्टच्या पॉप्युलर अॅप जसे, टीम्स, एज आणि ऑफिसही ऑफर सुद्धा करू शकतात. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2YFpF9J