नवी दिल्ली: तुमच्यापैकी बरेच जण वर सक्रिय आहेत आणि त्यावर सतत बातम्या आणि फोटोज पोस्ट देखील करत असतात. अधिकाधिक युजर्सना गुंतवून ठेवण्यासाठी आणि त्यांना उत्तम अनुभव देण्यासाठी Instagram नियमित प्लॅटफॉर्मवर बदल करत असते. लवकरच यूजर्सना इंस्टाग्रामवर आणखी एक बदल पाहायला मिळणार आहेत. जो, अशा लोकांसाठी खूप उपयुक्त ठरेल जे दिवसभर हे प्लॅटफॉर्म वापरत असतात आणि अजिबातच विश्रांती घेत नाहीत. अशा लोकांसाठी इंस्टाग्राम 'टेक अ ब्रेक' नावाच्या फीचरवर काम करत आहे. वाचा: काही लोक इन्स्टाग्रामसह सोशल मीडियाचा अति प्रमाणात वापर करतात. अशा लोकांना थोडा दिलासा देण्यासाठी कंपनी लवकरच टेक अ ब्रेक फीचर घेऊन येत आहे. अनेक वेळा लोक तासनतास इन्स्टाग्रामवर घालवतात. अशा स्थितीत आरोग्यावर वाईट परिणाम देखील होतो. असे होऊ नये आणि युजर्सना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून नवीन फीचरची चाचणी घेतली जात आहे. Instagram चे प्रमुख अॅडम मोसेरी यांच्या मते बहुप्रतिक्षित 'टेक अ ब्रेक' फीचर युजर्सना आठवण करून देईल की, त्यांनी प्लॅटफॉर्मवर बराच वेळ घालवला आहे. मोसेरीने ट्विटरवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, तुम्हाला हवे तेच हे फीचर करणार. तुम्ही अॅपवर ठराविक वेळ घालवल्यानंतर ते तुम्हाला Instagram मधून ब्रेक घेण्यास प्रोत्साहित करेल "१०,२०, किंवा ३० मिनिटे. किशोरवयीन युजर्ससाठी साठी हानिकारक असल्याची तक्रार सातत्याने केली जात आहे. अलिकडेच अमेरिकन व्हिसलब्लोअर फ्रान्सिस हॉगेन यांनी उघड केले की लोकप्रिय सोशल मीडिया अॅप्स तरुणांच्या मानसिक आरोग्यावर विपरित परिणाम करू शकतात. अशात हे नवीन वैशिष्ट्य Instagram युजर्ससाठी महत्वाचे ठरेल. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3wDjn6Z