नवी दिल्ली : ट्विटरसारखीच भारतीय असलेल्या ची लोकप्रियता वाढताना दिसत आहे. Amplitude च्या एका रिपोर्टनुसार, या अॅपने '५ नेक्स्ट हॉटेस्ट प्रोडक्ट्स ऑफ APAC' (APAC- एशिया पेसिफिक) च्या लिस्टमध्ये स्थान मिळवले आहे. या लिस्टमध्ये हे अॅप तिसऱ्या स्थानी आहे. वाचा: कू चे सह-संस्थापक आणि सीईओ अप्रमेय राधाकृष्ण यांनी अॅपच्या कामगिरीबाबतचे काही रिपोर्ट शेअर केले आहे. सह आणखी एक इंडियन स्टार्टअप ने देखील या यादीत स्थान मिळवले आहे. CoinDCX या यादीत टॉपवर आहे. CoinDCX हा एक क्रिप्टोकरेंसी एक्सचेंज प्लॅटफॉर्म असून, याची स्थापना २०१८ मध्ये झाली आहे. सध्या याचे ४ लाख यूजर्स असून, वॅल्यू १.१ बिलियन डॉलर आहे. CoinDCX भारताचा पहिला क्रिप्टो यूनिकॉर्न आहे, ज्याने एक ओव्हर-द-काउंटर डेस्क लाँच केला आहे. हे इंस्टिट्यूशनल इन्वेस्टर्सद्वारे बल्क ट्रेड्समध्ये मदत करेल. Koo बद्दल सांगायचे तर हा देखील ट्विटरप्रमाणेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. याद्वारे यूजर्सला १३ स्थानिक भाषेत आपले मत मांडता येते. यात हिंदी, कन्नड आणि तेलगूचा समावेश आहे. कंपनीची स्थापना २०२० साली झाली असून, रिपोर्टनुसार आतापर्यंत कंपनीने फंडिंगद्वारे ३४ मिलियन डॉलर्स जमा केले आहेत. Koo अॅप वर्ष २०२० मध्ये भारत सरकारद्वारे आयोजित AtmaNirbhar App इनोव्हेशन चॅलेंजचा विजेता ठरला होता. २० महिन्यातच तब्बल १५ मिलियन यूजर्स या अॅपशी जोडले गेले आहेत. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3FrGapy