नवी दिल्ली : मोबाईल डेटा दिवस पूर्ण व्हायच्या आतच संपतो. अशी अनेक युजर्सची तक्रार असते. अशात अतिरिक्त डेटाची गरज देखील भासते. तुम्हालाही या समस्या येत असतील तर ही विशेष माहिती तुमच्यासाठी. जाणून घ्या या भन्नाट प्लान्सबद्दल सविस्तर. वाचा: २५१ रुपयांचा प्लान : या Reliance Jio प्लानमध्ये युजर्सना ५० GB डेटा ऑफर केला जात आहे. कंपनीच्या काही डेटा प्लानमध्ये युजर्सना सध्याच्या प्लानच्या वैधतेइतकीच वैधता मिळते, परंतु या प्लानमध्ये असे अजिबात नाही. रिचार्ज केल्यावर, तुम्हाला यामध्ये फक्त ३०दिवसांची वैधता मिळेल. Airtel २५१ रुपयांचा प्लान : या Airtel डेटा प्लानसह, कंपनी आपल्या प्रीपेड युजर्सना ५० जीबी डेटा देत आहे ,परंतु वैधतेच्या बाबतीत हा प्लान रिलायन्स Jio सारखा नाही. हा प्लान युजर्सना सध्याच्या प्लानच्या वैधतेइतकीच वैधता देते, जी सर्वोत्तम आहे. या प्लानची खास बाब आहे. उदाहरणार्थ जर तुमच्या विद्यमान प्लानची वैधता आता ५० पेक्षा जास्त किंवा ३० दिवस असेल. तर तुम्हाला फायदा आहे. वर नमूद केलेल्या दोन्ही प्रीपेड प्लानसह, युजर्सना डेटा व्यतिरिक्त कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग किंवा कोणत्याही प्रकारच्या अतिरिक्त एसएमएस किंवा इतर कोणत्याही सुविधेचा लाभ मिळणार नाही कारण हे फक्त डेटा प्लान आहेत जे तुमचा डेली डेटा संपल्यावर काम करतील. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3HBK8h1