Full Width(True/False)

MediaTek: मीडियाटेकने लाँच केला फ्लॅगशिप Dimensity 9000 प्रोसेसर, जाणून घ्या वैशिष्ट्ये

नवी दिल्ली : प्रमुख चिपसेट निर्माता कंपनी मीडियाटेकने आपला नवीन फ्लॅगशिप MediaTek ला लाँच केले आहे. डायमेंसिटी ९००० ची टक्कर क्वालकॉमच्या फ्लॅगशिप प्रोसेसरशी होईल. डायमेंसिटी ९००० हा जगातील पहिला मोबाइल चिपसेट आहे, जो ४एनएम प्रोसेसवर तयार केला आहे. यात १० कोर Arm Mali-G७१० GPU आणि ५ th जनरेशनचे सहा APU आहे. यासोबत आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा सपोर्ट मिळतो. वाचा: Dimensity ९००० हा जगातील पहिला मोबाइल प्रोसेसर आहे, जो ३२० मेगापिक्सल लेंस सपोर्ट करतो. या प्रोसेसरसह २०२२ च्या पहिल्या तिमाहीपासून फोन लाँच केले जातील. या प्रोसेसरचा अधिकतम स्पीड ३.०५ GHz आहे. हा LPDDR५x ७५००Mbps देखील सपोर्ट करतो. Dimensity ९००० सह १८ बिट HDR-ISP ला डिझाइन केले आहे. याद्वारे तीन कॅमेऱ्याने एकाच वेळी एचडीआर व्हिडिओ रेकॉर्डिंगची सुविधा मिळते. हा प्रोसेसर आधीच्या व्हर्जनच्या तुलनेत ४एक्स बॅटरी वाचवतो. यासोबत ARM Mali-G७१० ग्राफिक्स आहे. हा प्रोसेसर १८० हर्ट्ज रिफ्रेश रेटसह फुल एचडी प्लस डिस्प्ले सपोर्ट करेल. यासोबत ५जी साठी १६ स्टँडर्ड टेक्नोलॉजी दिली आहे. ५जी नेटवर्कवर या प्रोसेसरचा स्पीड ७जीबीपीएस पर्यंत असेल. कनेक्टिव्हिटीसाठी डायमेंसिटी ९००० सह ब्लूटूथ ५.३, वाय-फाय ६ई २x२, वायरलेस स्टीरियो स्टुडिओ आणि Beidou III-B1 C GNSS चा सपोर्ट मिळतो. मीडियाटेकनेयाच आठवड्यात इंटरनेट ऑफ थिंग्स डिव्हाइससाठी Filogic 130 आणि Filogic 130A प्रोसेसर सादर केला आहे. या दोन्ही प्रोसेसरसोबत मायक्रोप्रोसेसर (MCU), AI इंजिन, Wi-Fi ६ आणि Bluetooth ५.२ चा सपोर्ट मिळतो. या प्रोसेसरसह एक पॉवर मॅनेजमेंट यूनिट (PMU) देखील आहे. Filogic 130A हा एक ऑडिओ डिजिटल सिग्नल प्रोसेसर आहे, ज्यासोबत वॉइस असिस्टेंटला जोडता येईल. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/30GjBhS