Full Width(True/False)

MediaTek Helio G35 चिपसेट आणि ४ GB रॅमसह येणार Moto G Power 2022, 'इतकी' असेल किंमत

नवी दिल्ली: Motorola, नवीन स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत असून दरम्यान, आगामी स्मार्टफोन गीकबेंच वेबसाइटवर दिसला आहे, जिथून त्याच्या काही वैशिष्ट्यांबद्दल माहिती प्राप्त झाली आहे. याआधीही या डिव्हाइस संबंधित अनेक अहवाल लीक झाले होते, ज्यावरून किंमतीची माहिती मिळाली होती. पण, Motorola ने अद्याप G Power 2022 च्या लाँचची तारीख, किंमत आणि स्पेसिफिकेशन बद्दल कोणतीही माहिती शेअर केलेली नाही. वाचा: मीडिया रिपोर्ट्सनुसार, Moto G Power 2022 स्मार्टफोन वेबसाइटवर लिस्ट झाला आहे. लिस्टनुसार, हा स्मार्टफोन ऑक्टा-कोर प्रोसेसर आणि ४ GB RAM ने समर्थित असेल. हा हँडसेट अँड्रॉइड ११ वर काम करेल असे सांगितले जात आहे. त्याच वेळी, वेबसाइटवर या फोनला सिंगल-कोरमध्ये १६५ पॉइंट्स आणि मल्टी-कोरमध्ये १,०१३ पॉइंट्स मिळाले आहेत. अहवालांनुसार , मोटो जी पॉवर 2022 एचडी स्क्रीनपासून मजबूत बॅटरीपर्यंत दिली जाऊ शकते. Moto G Power 2022 ची अपेक्षित किंमत लीक रिपोर्ट्सनुसार, Moto G Power 2022 स्मार्टफोनची किंमत जवळपास $१९९ म्हणजेच जवळपास १४,८०० रुपये ठेवली जाऊ शकते. हे अनेक रंगांच्या पर्यायांसह बाजारात लाँच केले जाऊ शकते. Moto G Power : Moto G Power स्मार्टफोन गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये लाँच झाला होता. या स्मार्टफोनमध्ये ६.४ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले आहे. याचे रिझोल्यूशन १०८० x २३०० पिक्सेल आहे आणि आस्पेक्ट रेशो १९१७: ९ आहे. यात स्नॅपड्रॅगन ६६५ प्रोसेसर आणि ४ जीबी रॅम आहे. याशिवाय, स्मार्टफोनमध्ये १६ MP ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आणि ५००० mAh बॅटरी मिळेल, जी १० W रॅपिड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3F6uto8